पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, पुण्याच्या जागेवरून महायुती आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड मोठा राजकीय भूकंप पहायला मिळाला आहे. बहुचर्चेत असलेली पुण्याची प्रतिष्ठेची जागा अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली असून, या ठिकाणी विक्रम संजय काकडे यांना पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, पक्षाच्या या धक्कादायक निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या स्थानिक नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून आता पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब पडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुटणार हे जवळपास स्पष्ट होते, त्यामुळे पक्षातील अनेक माजी आमदारांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी या जागेवर आपली वर्णी लावण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. यामध्ये माजी आमदार दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात, विलास लांडे यांच्यासह अजित गव्हाणे, रणजित शिवतारे आणि पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांसारख्या मातब्बर नेत्यांची नावे आघाडीवर होती. मात्र, ऐनवेळी या सर्वच दिग्गजांना बाजूला सारून पक्षश्रेष्ठींनी विक्रम काकडे यांचे ‘सरप्राईज’ नाव पुढे आणल्याने पक्षात मोठी नाराजी पसरली असून, एका ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्त्याने थेट आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
पक्षाला रामराम ठोकणाऱ्या या आक्रमक नेत्याने आपल्या राजीनामा पत्रात पक्षश्रेष्ठींवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. राजीनाम्यात म्हटले आहे की, “‘आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या चुकीच्या उमेदवाराची घोषणा आज झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आम्ही आमचे घरदार दावणीला लावले तीस वर्ष पक्षाशी एकनिष्ठ आहे कर्जबाजारी झालोय आणि 2017 ला ज्या संजय काकडेंनी पक्ष फोडला पक्षाचे दोन दोन टर्मचे नगरसेवक फोडून भारतीय जनता पार्टीत नेले. त्यांना आर्थिक रसद पुरवली आणि अजितदादांच्या पाठीत खंजीर खुपसून जे देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर जाऊन बसले, अशा संजय काकडेंच्या मुलाला जर पक्ष तिकीट देत असेल, तर आमच्यासारख्या निष्ठावंतांना पक्षात काय किंमत राहणार?”
त्यांना रसद पुरवली व अजितदादांच्या पाठीत खंजीर खुपसला व देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर जाऊन बसले अशा संजय काकडे च्या मुलाला जर पक्ष तिकीट देत असेल तर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षात काय किंमत राहणार आहे त्यामुळे मी माझ्या सर्व पदांचा राजीनामा आपल्याकडे सुपूर्द करत आहे तो आपण नम्रपणे स्वीकारावाही आपणास नम्र विनंती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच राष्ट्रवादीतील ही उघड बंडखोरी समोर आल्यामुळे आता अजित पवारांसमोर पुणे जिल्ह्यातील पक्षाची ही मोठी पडझड आणि अंतर्गत धुसफूस रोखण्याचे प्रचंड मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या राजीनामा सत्रानंतर पुण्यातील इतर इच्छुक नेते काय पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन














