Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

खंडणी प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक; ओबीसी नेते हाके, सानप यांच्यावर गंभीर आरोप

by News Desk
January 22, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
खंडणी प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक; ओबीसी नेते हाके, सानप यांच्यावर गंभीर आरोप
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळाले आहे. या प्रकरणी खंडणीचा आरोप असलेला वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आला. या प्रकरणातील मास्टरमाईंड लवकर शोधावा आणि आरोपींवर लवकरात लवकर शिक्षेची कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. अशातच आता पुण्यात संभाजी ब्रिगेडने मंत्री धनंजय मुंडे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके बाळासाहेब सानप यांच्यावर संभाजी ब्रिगेडने गंभीर आरोप केले आहेत. महाज्योती संस्थेला ब्लॅकमेल करून खंडणी मागितले असल्याचा प्रकार समोर आला आहे . या घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केले आहेत.

संभाजी ब्रिगेड आक्रमक

‘बहुजन समाजात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांची स्थापना केली आहे. विविध प्रकारच्या सरकारी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण देता यावे यासाठी या संस्थांकडून निविदा प्रक्रिया राबवून क्लासेसची निवड करण्यात येते. परंतु अलीकडे या संस्थाना ब्लॅकमेल करून आपल्या मर्जीतील क्लासेस चालकांना हे काम मिळवून देण्यासाठी दबाव आणल्याची, तसेच या संस्थांना आणि निवड झालेल्या क्लासेस चालकांना खंडणी मागितल्याची प्रकरणे समोर येत आहेत. महेश घरबुडे नामक व्यक्ती व त्याच्या साथीदारांचे नाव यामध्ये समोर येत आहे’, असं प्रदिप कणसे म्हणाले आहेत.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

महाज्योती संस्थेने ब्लॅकमेल करून खंडणी मागणाऱ्या लोकांच्या कायदेशीर चौकशीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत, परंतु इतर संस्थांनी देखील अशा प्रकरणांची कायदेशीर चौकशी करण्यासाठी पावले उचलायला हवीत. महाज्योती संस्थेच्या अधिकाऱ्यांनी नागपूरमध्ये पोलीस तक्रार करूनही अद्याप संबंधितांवर गुन्हा दाखल झाला नाही. त्यांच्या तक्रारीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याचा उल्लेख असूनही संबंधित लोकांवर गुन्हा नोंद होण्यापासून कोण वाचवत आहे? महाज्योती या संस्थेने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. मात्र या समितीवर देखील मोठ्या प्रमाणावर दबाव आणला जात आहे. या चौकशी समितीवर हा दबाव नक्की कोण आणत आहे? याचीही चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. असं कणसे म्हणाले.

संस्था व क्लासेस चालकांना खंडणी मागितल्याचे आरोप असणाऱ्या महेश घरबुडे याच्यासोबत लक्ष्मण हाके, बाळासाहेब सानप या व्यक्ती सातत्याने सोबत दिसतात. मागील सरकारच्या काळात धनंजय मुंडे सामाजिक न्यायमंत्री असताना त्यांनी बार्टी संस्थेत आपल्या मर्जीतील अनेक लोकांच्या नियुक्त्त्या केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या शासकीय संस्थांना व क्लासेस चालकांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात नाव समोर येणारा महेश घरबुडे आणि धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, बाळासाहेब सानप यात समावेश असलेल्या इतर लोकांची नक्की काय लिंक आहे? याचा तपास व्हावा, अशी मागणी  संभाजी ब्रिगेडच्या प्रदिप कणसे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-घटस्फोटाचं धक्कादायक कारण आलं समोर; लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिने…

-पुणेकरांनो सावधान! शहरात दुर्मिळ ‘GBS’ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ; आजाराची लक्षणे नेमकी काय? वाचा सविस्तर…

-पुणे महापालिकेची निवडणूक कधी होणार? न्यायालयातील सुनावणी संदर्भात महत्त्वाची अपडेट

-अजित पवार पालकमंत्री होताच पुण्यात राष्ट्रवादीला हत्तीचं बळ, शिलेदाराचं पालिका निवडणुकीवर मोठं विधान

-वाल्मिक कराड प्रकरणी भाजप नेत्याची सीआयडीकडून चौकशी; ‘तो’ नेता कोण?

Tags: Laxman HakeOBCPradip Sanappune newsओबीसीपुणे बातम्याप्रदिप सानपलक्ष्मण हाके
Previous Post

घटस्फोटाचं धक्कादायक कारण आलं समोर; लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिने…

Next Post

महाकुंभमेळ्याचा प्रवास महागला; विमानाच्या तिकीटदरात चौपट वाढ, मोहोळ काय म्हणाले?

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
Murlidhar Mohol

महाकुंभमेळ्याचा प्रवास महागला; विमानाच्या तिकीटदरात चौपट वाढ, मोहोळ काय म्हणाले?

Recommended

‘मतदान करा अन् निम्म्या किमतीत खा ‘पॉट आईस्क्रिम’; पुण्यात मतदान जनजागृतीसाठी अनोखी शक्कल

‘मतदान करा अन् निम्म्या किमतीत खा ‘पॉट आईस्क्रिम’; पुण्यात मतदान जनजागृतीसाठी अनोखी शक्कल

May 11, 2024
Ajit Pawar And Raj Thackeray

“राज ठाकरेंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका”; अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

November 7, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved