Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

महापालिकेकडून नागरिकांच्या जीवनाशी खेळ, शुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा; जीबीएसचा प्रादुर्भाव वाढला

by News Desk
January 23, 2025
in Pune, आरोग्य, पुणे शहर, राजकारण
Pune GBS
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

विरेश आंधळकर, पुणे : शहरात जीबीएस (गुइलेन बॅरी सिंड्रोम) या दुर्मिळ आजाराने धोक्याची घंटा वाजवली आहे. आतापर्यंत जवळपास ५८ रुग्ण आढळले असून, सिंहगड रोड परिसरातील नांदेड गाव, किरकटवाडी आणि धायरी भागात या आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आज नांदेड गावात पाहणी केली. या भागामध्ये कोणतेही शुद्धीकरण न करता केला जाणारा पाणीपुरवठा या आजारासाठी निमंत्रण ठरल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, दूषित पाणी पिल्यामुळे या आजाराची लागण होते. नांदेड गावातील ४०-५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली जुनी विहीर या भागातील पाण्याचा मुख्य स्रोत असून खडकवासला धरणातून कोणतेही शुद्धीकरण न करता पाणी थेट विहिरीत टाकले जाते. महापालिकेकडून क्लोरीन टाकून पाणी शुद्ध करण्याचा दावा केला जात आहे. मात्र, स्थानिक नागरिक याबाबत समाधानी नसून पाणी दूषित येत असल्याची तक्रार करत आहेत. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी नांदेड गाव, किरकटवाडी नांदोशी या परिसराचा समावेश पुणे महापालिकेत झाला असला, तरी अद्याप जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलेले नाही. दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना आजाराची लागण होत आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांमध्ये मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यंत्रणा कमी पडत आहेत. त्यामुळे अनेक विकासकामे रखडली असून त्याचा फटका थेट स्थानिक नागरिकांना बसत आहे. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आज निर्माण झालेल्या परिस्थितीला महापालिका तसेच राज्य सरकार जबाबदार असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. एवढे होऊनही प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखीन परिस्थिती गंभीर होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-

-आधी बंद दाराआड चर्चा अन् नंतर शेजारी बसणं टाळलं; पवार काका-पुतण्याच्या मनात नेमकं काय?

-Pune News: लवकर श्रीमंत व्हायचं म्हणून त्याने राजस्थानमधून अफू आणलं अन्…

-पुण्यात ‘GBS’ची रुग्णसंख्या वाढली, आमदार रासनेंची पालिका प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

-पुण्यात ‘GBS’ चे रग्ण कोणत्या भागात जास्त? ‘त्या’ पाण्याची होतेय चाचणी, पालिका प्रशासनानं दिली महत्वाची माहिती

-पुण्यात ‘GBS’ ची वाढती रुग्णसंख्या; राज्य सरकारने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Tags: Bhimrao TapkirChlorineGuillain Barrie SyndromeKirkatwadiMunicipalNandedpuneRajendra BhosaleSinhagad Roadकिरकटवाडीक्लोरीनगुइलेन बॅरी सिंड्रोमनांदेडपुणेभीमराव तापकीरमहापालिकाराजेंद्र भोसलेसिंहगड रोड
Previous Post

आधी बंद दाराआड चर्चा अन् नंतर शेजारी बसणं टाळलं; पवार काका-पुतण्याच्या मनात नेमकं काय?

Next Post

कर्ज काढलं पण बाळासाहेब ठाकरेंच्या गाडीसारखीच हुबेहूब गाडी तात्यांनी घेतली अन्…; मोरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Vasant More

कर्ज काढलं पण बाळासाहेब ठाकरेंच्या गाडीसारखीच हुबेहूब गाडी तात्यांनी घेतली अन्...; मोरेंनी सांगितला 'तो' किस्सा

Recommended

शिक्षण फक्त दुसरीपर्यंतच मात्र, ५ राज्यातला अट्टल ड्रग्जमाफिया अखेर पोलिसांच्या ताब्यात

Pune Drugs: विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा ड्रग्ज प्रकरण उघडकीस

August 10, 2024
Pune: ‘मी आयएएस आहे, माझ्या नादी लागाल तर….’; पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा उच्छाद

Pune: ‘मी आयएएस आहे, माझ्या नादी लागाल तर….’; पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा उच्छाद

July 28, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved