Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

छत्रपती शिवरायांकडे खरंच वाघ्या नावाचा कुत्रा होता का? संभाजीराजेंनी दाखवले ‘ते’ फोटो

by News Desk
March 26, 2025
in Pune, राजकारण
छत्रपती शिवरायांकडे खरंच वाघ्या नावाचा कुत्रा होता का? संभाजीराजेंनी दाखवले ‘ते’ फोटो
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संजाभी महाराजांवरुन सध्या राज्याच्या राजकारणात मोठा वाद सुरु आहे. रायगडावर छत्रपती शिवरायांच्या समाधीजवळ वाघ्या कुत्र्याचे स्मारक आहे. हे स्मारक छत्रपती शिवरायांच्या समाधीपेक्षाही उंचीने मोठे आहे. याच स्मारकाला हटवण्यावरुन आता राजकीय वर्तुळात मोठा वाद सुरु झाला आहे. छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचे स्मारक रायगडावरुन हटवण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारला दिले आहे. त्यांच्या मागणीनंतर वाघ्या कुत्र्याच्या ऐतिहासिक संदर्भ शोधले जाऊ लागले, पुरावे गोळा केले जाऊ लागले.

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

“आज मी पुरातत्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतली. त्यांना सविस्तर इतिहास सांगितला. माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून अनेक शिवभक्तांनी पुरातत्व खात्याकडून जे मिळवलं होतं, त्याची मांडणी तिथे केली. पुरातत्व खात्याने माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे सांगितलं आहे की, वाघ्या कुत्र्याचं स्मारक याची त्यांच्या सुरक्षित स्थळांच्या यादीत कुठेही नोंद नाही. वाघ्या कुत्र्याचं स्मारक १९३६ ला पूर्ण झालं. २०३६ पर्यंत ते स्मारक काढलं नाही तर त्याची नोंद संरक्षित स्थळांच्या यादीत समाविष्ट होईल ही माहितीही पुरातत्व खात्याने दिली आहे. त्यामुळे हा विषय मी घेतला आहे. अनेक शिवभक्तांनीही पूर्वी हा विषय घेतलेला आहे. दुर्दैवाने त्यावर न्याय मिळाला नाही म्हणून मी ही मागणी पुन्हा करतोय”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुत्रे असू शकतात. स्वत: महाराजांचेही काही कुत्रे असू शकतात. पण राजसंन्यास या नाटकातून एक दंतकथा निर्माण झाली. त्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. त्यातून वाघ्या कुत्र्याची दंतकथा निर्माण झाली आणि त्याचं स्मारक तिथे बांधण्यात आलं”, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.

दरम्यान, आता छत्रपती शिवाजी महाराजांकडे खरंच वाघ्या नावाचा कुत्रा होता का? यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन अनेक दावे, प्रतिदावे केले जात आहेत. नेमकं सत्य काय हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बालेवाडीतील विद्युत उपकेंद्र उभारणीचे काम सुरु होणार; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, कळमकरांच्या प्रयत्नांना यश

-विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आण्णा बनसोडेंची बिनविरोध निवड; उद्या होणार घोषणा

-‘दाखल कलमानुसार अटक करण्याची गरज नव्हती’ कोरटकरच्या वकीलाचा न्यायालयात मुद्दा; असीम सरोदेंचा काय म्हणाले?

-संतापजनक! चौथीत शिकत असणाऱ्या चिमुरडीला खाऊ देतो म्हणत बोलवून घेतलं अन्…

-‘फडणवीस, आता तरी आपल्या मंत्र्यांचे प्रताप थांबवा’, शरद पवारांच्या नेत्याचा मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

Tags: Chhatrapati Shivaji MaharajSambhajiraje Chhatraptiछत्रपती शिवाजी महाराजवाघ्या कुत्र्याचे स्मारकसंभाजीराजे छत्रपती
Previous Post

बालेवाडीतील विद्युत उपकेंद्र उभारणीचे काम सुरु होणार; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, कळमकरांच्या प्रयत्नांना यश

Next Post

ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणला अन् पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
Sassoon Hospital

ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणला अन् पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला

Recommended

“मी लोकसभेची तयारी करतोय, पण…” मुरलीधर मोहोळांनी अखेर लोकसभेचे पत्ते उघडले, नेमकं काय म्हणाले वाचा

“मी लोकसभेची तयारी करतोय, पण…” मुरलीधर मोहोळांनी अखेर लोकसभेचे पत्ते उघडले, नेमकं काय म्हणाले वाचा

March 1, 2024
पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार; जीव वाचवणाऱ्या डॉक्टरनेच घेतला बळी, निघाला कोयता गँगचा मेंबर

पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार; जीव वाचवणाऱ्या डॉक्टरनेच घेतला बळी, निघाला कोयता गँगचा मेंबर

July 5, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved