पुणे : राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. ज्येष्ठन नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कारणास्तव एकत्र आल्याचे पहायला मिळत होते. त्यावरुन राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जावं, असा पक्षात मतप्रवाह असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे. शरद पवारांच्या वक्तव्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
केंद्रात विरोधी पक्षात बसायचं की नाही, याचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यावा लागेल. एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावं. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते, त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकच आहे, त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांघले गेलेले आहेत. होय, राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतं मतदारसंघातली विकासकामं करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, पण याबाबतचा निर्णय हा मी देणार नाही, त्यांनी तो निर्णय एकत्र बसून घ्यावा. आमदारांमध्ये अस्वस्थता असू शकते, मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे, पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा. आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत, असंही शरद पवार म्हणाले आहेत. एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.
‘आमच्या बाबतीत, पक्षात दोन मते आहेत. एक म्हणजे आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुन्हा एकत्र यावं. दुसऱ्या गटाला वाटतं, की आम्ही थेट किंवा अप्रत्यक्षपणे भाजपसोबत जाऊ नये. त्यामुळे इंडिया आघाडीत सामील होऊन आघाडीची पुनर्रचना करावी’, असं शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का?; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
-“आमच्या भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ने घेतला”- हेमंत रासने
-पुण्यात धक्कादायक प्रकार; रिक्षा चालकाने प्रवासी तरुणीला केले अश्लील मेसेज अन् व्हिडीओ कॉल करुन…