Monday, July 20, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बड्या अधिकाऱ्यांना घेऊन आमदार थेट नागरिकांच्या दारात, रासनेंच्या धडक मोहिमेची शहरात चर्चा

by News Desk
May 8, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Hemant Rasane
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : “समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी वारंवार सरकारी कार्यालयांचे फेरे मारावेत” ही आपल्या व्यवस्थेतील जुनी तक्रार असली, तरी त्यातून मार्ग काढत कसबा मतदारसंघात एक वेगळीच सुरुवात आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचं दिसत आहे. रासने यांनी आज सकाळच्या प्रहरी नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी एक संयुक्त पाहणी दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि वीजपुरवठा यांसारख्या मुलभूत सुविधांवरील तक्रारींवर जागेवरच उपाय शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. पथविभागाचे अनिरुद्ध पावसकर, मलनिसारणचे मुख्य अभियंता संतोष तांदळे, अतिक्रमण विभागाचे संदीप खलाटे, परिमंडल 5 चे उपआयुक्त सुनिल बल्लाळ, आकाश चिन्ह उपायुक्त श्री. ठोंबरे, भवानी पेठचे सहआयुक्त किसन दगडखेर, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे सुहास जाधव, महावितरणचे तरंग यांच्यासह भाजपचे कसबा मंडलाध्यक्ष अमित कंक, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही दौऱ्यात सहभागी झाले होते.

You might also like

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

“नागरिकांच्या समस्या केवळ नोंदवून घेणे पुरेसे नाही. त्या प्रत्यक्ष पाहून तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. हेच या दौऱ्याचे वैशिष्ट्य आहे,” असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी सांगितले. तसेच नालेसफाई व ड्रेनेज कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले.

“गेल्या पाच महिन्यांपासून नियमितपणे अशा दौऱ्यांचे आयोजन करून नागरिकांचे प्रश्न ऐकले जात आहेत. प्रशासनाच्या सक्रिय सहभागामुळे अनेक समस्या तात्काळ सोडवण्यात आल्या असून, उर्वरित समस्यांचेही लवकरच निराकरण केले जाईल,” असे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले.

या धडक मोहिमेमुळे प्रशासन आणि नागरिकांमधील अंतर कमी होत असून, ‘कामासाठी सरकारी दारात जा’ या ठोकताळ्याला छेद देत प्रशासनच आता नागरिकांच्या दारात पोहचल्याने या उपक्रमाची शहरभर चर्चा रंगली आहे.

दरम्यान, स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा अभियानांतर्गत कसब्यातील बहुतांश क्रॉनिक स्पॉट बंद करण्यात आले असून या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावित दोन भुयारी मार्गांचा डीपीआर तयार करण्याचे काम देखील सुरू झाले आहे. रस्त्यावरील अनधिकृत फ्लेक्स, अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने व्यापक मोहीम राबवण्याची सूचना यावेळी रासने यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘एकत्र येण्याबाबत सुप्रिया-अजित यांनी चर्चा करावी, मी…’; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकारणात मोठी खळबळ

-तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का?; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

-यंदा ८-१० दिवस आधीच पावसाचं आगमन होणार; ‘या’ दिवशी पुण्याला यलो अलर्ट, भारतीय हवामान विभागाची माहिती

-“आमच्या भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ने घेतला”- हेमंत रासने

-भारतानं घेतला एका प्रत्युत्तरात ६ हल्ल्यांचा बदला; पाकमधले ९ दहशतवादी तळ भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त

Tags: hemant rasaneKasbaMLA RasanePrithviraj P.B.puneआमदार हेमंत रासनेकसबापुणेपृथ्वीराज पी.बी.
Previous Post

‘एकत्र येण्याबाबत सुप्रिया-अजित यांनी चर्चा करावी, मी…’; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकारणात मोठी खळबळ

Next Post

‘आमचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही, पण पाकने तणाव वाढवला तर…’; अजित डोवालांचा इशारा

News Desk

Related Posts

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
Next Post
Ajit Dowal

'आमचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही, पण पाकने तणाव वाढवला तर...'; अजित डोवालांचा इशारा

Recommended

Hemant Rasane

हेमंत रासनेंकडून ‘घर चलो अभियाना’ने प्रचाराला सुरवात; थेट घेतायेत जनतेच्या भेटीगाठी

October 28, 2024
“इकडे कशाला टाईमपास करतोस?” राज ठाकरेंनी पिट्याभाईला झापलं, नेमकं काय झालं?

“इकडे कशाला टाईमपास करतोस?” राज ठाकरेंनी पिट्याभाईला झापलं, नेमकं काय झालं?

November 6, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved