पुणे : पुणे शहर हे सासंकृतिक वारसा लाभलेलं शहर. या शहरात अलिकडे गुन्हेगारीने चांगलाच उच्चांक गाठला असून दररोज खून, अपहरण, चोरी, दहशवाद पसरवणे, महिला अत्याचार अशा घटना घडत असतात. अशातच आता शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या बाणेर परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, हा गैरप्रकार एका बाप-लेकाने सुरू केला होता.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. बाणेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार स्पा सेंटर्सवर टाळे ठोकले आणि मुख्य सूत्रधारांना अटक केली. या कारवाईदरम्यान बाणेर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून स्पा सेंटर्सची पाहणी केली. त्यातून सेक्स रॅकेटचा प्रकार समोर आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिराज चौधरी आणि वसीम चौधरी या बाप-लेकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह जागा मालक आणि एका महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या घटनेनंतर पुणे पोलिसांनी शहरातील इतर स्पा सेंटर्सची कसून तपासणी सुरू केली आहे. बाणेरसारख्या उच्चभ्रू परिसरात असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार असल्याचे सांगितले आहे. या कारवाईमुळे अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई सुरू असल्याचे दिसून येते.
महत्वाच्या बातम्या
-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपक मानकरांनी दिला शहराध्यक्षपदाचा राजीनामा; पत्रात नेमकं काय म्हणाले?
-गजा मारणेची ढाब्यावरची मटण पार्टी पोलिसांना पडली महागात; ३ पोलिसांचे निलंबन, नेमकं काय प्रकरण?
-SSC Result: महापालिकेची हायटेक शाळा; राखली शंभर टक्के निकालाची परंपरा!
-शरद पवारांच्या नेत्यांनी पोस्टर लावत घातली साद; चर्चा झाल्यानंतर काही तासांतच पोस्टर अचानक गायब