Sunday, July 19, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Entertainment

शशिकांत धोत्रेंचा रोमॅन्टिक ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मंत्रमुग्ध करणारं पोस्टर, टिझर प्रदर्शित

by News Desk
April 3, 2025
in Entertainment
Sajana
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : चित्रपटसृष्टीला नेहमीच विविध रोमॅन्टिक कथांची प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. विशेषतः तरूण-तरुणींच्या हृदयावर रोमॅन्टिक कथांनीच अधिराज्य गाजवलं आहे. सिनेसृष्टीच्या इतिहासात असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कथांसह प्रयोग केले आहेत. मात्र, प्रेमकथा नेहमीच चित्रपटांचा आत्मा राहिल्या आहेत. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना, संपुर्ण फॅमिलीला आकर्षित करणारा प्रकार म्हणून रोमॅन्टिक सिनेमांकडे पाहिलं जातं. असाच रोमॅन्टिक चित्रपट ‘सजना’ हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. शशिकांत धोत्रे निर्मित आणि आणि दिग्दर्शित ‘सजना’ सिनेमा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला असून या सिनेमाचे मंत्रमुग्ध करणारे पोस्टर आणि टिझर प्रदर्शित झाले आहेत.

‘सजना’ सिनेमाच्या पोस्टरवर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दोन प्रेमी आपण पाहू शकतो जे पाण्यात रोमँटिक पोजमधे आहेत. धोत्रेंच्या चित्रांसारखंच हे पोस्टरसुद्धा एक सुंदर पेंटिंगच आहे. जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार शशिकांत धोत्रे यांचे जिवलग मित्र प्रमोद कुर्लेकर यांनी तयार केले आहे. ज्यामध्ये दोन प्रेमी पाण्यावर तरंगत आहेत. आजूबाजूला असलेल्या संपूर्ण जगाचा जणू त्यांना विसरच पडलाय. ‘सजना’ सिनेमाच्या टिझरमध्येही ह्याच जोडप्याला आपण रोमँटिक संवाद साधताना पाहू शकतो.

You might also like

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा

‘रावण रेपिस्ट पण त्याने कधीही परस्त्रीला हातही…’; जया किशोरींच्या वक्तव्याने खळबळ

विशेष म्हणजे टीझरमधील प्रत्येक शॉट लक्षवेधी असून पेंटींग प्रमाणेच बारकाईने चितारलेले वाटतात, तरुण फ्रेश जोडी या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे. त्यांचा चेहरा टिझरमध्ये अद्याप पूर्णपणे उघड केला गेला नाही आहे. टिझरमध्ये सुंदर पेंटीगसारख्या व्हीजुअल्स सोबतच कर्णमधूर असे ओंकारस्वरूपचं संगीत आणि सोनू निगमचा आवाजात आहे. जे नक्कीच तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित ही प्रेमकथा असून गावातील सुंदर दृश्य आणखी शोभा वाढवते. टिझरच्या शेवटी प्रेमापोटी एकमेकांमध्ये गुंतलेल्या जोडप्याला कोणते परिणाम भोगावे लागतात याबद्दल हि छोटी झलक पहायला मिळते. त्यामुळे नक्की चित्रपटाची कथा काय असणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे. टिझर मध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ‘सजना’ सिनेमा २३ मे २०२५ ला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘सजना’ चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे. शशिकांत धोत्रे हे एक संवेदनशील चित्रकार म्हणून लोकप्रिय आहेतच आणि आता ते ‘सजना’ पासुन चित्रपट क्षेत्रात एका संवेदनशील रोमॅंटीक कथेच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. त्यांनी काढलेली चित्रं आज देश-विदेशात लाखोंच्या संख्येनं रसिकांची दाद मिळवतायत, अशाच प्रकारे त्यांचा हा पहिला मराठी सिनेमा सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे.

ॲक्शन चित्रपटांच्या गर्दीत नवोदित प्रेमाच्या कथा पाहणे नेहमीच वेगळा अणि सुखद अनुभव देऊन जातात, त्यामुळे सुमधूर संगीतानी सजलेला रोमॅंटीक ‘सजना’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक होतील. ‘सजना’ २३ मे २०२५ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मंगेशकर रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा मोठा; मंत्रालयातून फोन तरी ऐकेना, गर्भवतीचा दुर्दैवी अंत

-आता सरकारला प्रश्न विचारायचा नाहीत?, सुरक्षा विधेयक पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारं

-स्वारगेट अत्याचार प्रकरण: आरोपी गाडेच्या वकिलाचा जामीनासाठी अर्ज, धक्कादायक दावा

-राष्ट्रवादीच्या शंतनू कुकडेवर पोस्को अंतर्गत गुन्हा; चाकणकरांनी पुणे पोलिसांना दिल्या महत्वाच्या सूचना

-शंतनू कुकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारीच नाही, तीन महिन्यांपूर्वीच दिला होता राजीनामा

Tags: MovieSajanaShahikant DhotreSonu Nigamचित्रपटशाहिकांत धोत्रेसाजनासोनू निगम
Previous Post

मंगेशकर रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा मोठा; मंत्रालयातून फोन तरी ऐकेना, गर्भवतीचा दुर्दैवी अंत

Next Post

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोग्य मंत्र्यांचे कारवाईचे आदेश; आता सगळीच चौकशी होणार

News Desk

Related Posts

Pune news
Entertainment

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

by News Desk
June 25, 2025
Navjyot Bandewadkar
Entertainment

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा

by News Desk
March 18, 2025
Jaya Kishori
Entertainment

‘रावण रेपिस्ट पण त्याने कधीही परस्त्रीला हातही…’; जया किशोरींच्या वक्तव्याने खळबळ

by News Desk
March 7, 2025
Chaava
Entertainment

‘छावा’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, गणोजी शिर्केचे वंशज आक्रमक, नेमकं कारण काय?

by News Desk
February 21, 2025
Sarang Sathaye
Entertainment

मनसेच्या इशाऱ्यानंतर भाडिपाचा पुण्यातील ‘तो’ शो रद्द; सारंग साठ्ये म्हणाला, ‘आगीत तेल…’

by News Desk
February 13, 2025
Next Post
Hospital

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोग्य मंत्र्यांचे कारवाईचे आदेश; आता सगळीच चौकशी होणार

Recommended

‘नट-नट्यांचं राजकारणात काय काम?’; अजित पवारांनी उडवली अमोल कोल्हेंची खिल्ली

‘नट-नट्यांचं राजकारणात काय काम?’; अजित पवारांनी उडवली अमोल कोल्हेंची खिल्ली

March 4, 2024
‘ही निवडणूक गावकी-भावकीची नाही तर देशाचा पंतप्रधान ठरवण्याची’; आढळराव पाटलांचा कोल्हेंना खोचक टोला

‘मी डमी नाही डॅडी उमेदवार’; आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंच्यात डमी उमेदवारावरुन जुंपली

April 26, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved