पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (भाजप) पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची फेरनियुक्ती केली आहे. या पदासाठी पक्षातील अनेकांनी फिल्डींग लावली होती मात्र घाटे यांचीच पुन्हा निवड झाल्याने इतर इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा आहे. घाटे यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी घरकुल लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात शहरातील अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकांनी अनुपस्थिती दर्शवल्याने पक्षांतर्गत गटबाजीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कार्यक्रमाला संख्येने कमी उपस्थितीमुळे तो रद्द करून पक्ष कार्यालयात हलवण्यात आल्याचे सांगितले जाते.
घाटे यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संध्याकाळी ५ वाजता उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मोजकेच पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित राहिले, तर बरेच जण बाहेरूनच निघून गेले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार व पुणे जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक धनंजय महाडिक आणि शहर निरीक्षक शेखर इनामदार उपस्थित होते. तरीही पदाधिकाऱ्यांच्या कमी उपस्थितीमुळे पक्षातील अंतर्गत नाराजी उघड झाल्याचे बोलले जात आहे.
राज्यभरात भाजपने संघटनात्मक बदल करताना पुण्यात विद्यमान शहराध्यक्षांनाच पुन्हा संधी दिल्याने इतर इच्छुकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या फेरनियुक्तीमुळे पक्षात गटबाजी वाढली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी पक्षाच्या एकतेला आव्हान देऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महापालिकेत भाजपचे सुमारे १०० माजी नगरसेवक आहेत. यातील अनेक पदाधिकाऱ्यांंनी केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेत बोलविलेल्या नाले सफाईच्या बैठकीस हजेरी लावली. मात्र, या बैठकीनंतर घाटे यांच्या नियुक्तीकडे अनेकांनी पाठ फिरविली त्यामुळे पक्ष कार्यालयात केवळ घाटे यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती असं सांगितलं जात आहे.तर १०० मधील अवघे डझनभर नगरसेवक उपस्थित होते. सध्या हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या
-प्रेयसीने दिला लग्नाला नकार, त्याने थेट इनटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर टाकला
-नालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा; मुरलीधर मोहोळांचे आदेश
-भाजप खासदार मेधा कुलकर्णींना स्वपक्षीय नेत्याची धमकी, म्हणाले “आधी तिकीट कापलं आता…”
-रक्षकच निघाले भक्षक! वाघोलीत पोलिस अधिकाऱ्यानेच केला जमीन घोटाळा, चौघांवर गुन्हा दाखल
-पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा थरार; भररस्त्यात टोळक्याचा तरुणावर हल्ला