Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यातील ‘त्या’ बहुचर्चित रस्त्याला स्थगिती; नेमकं कारण काय?

by News Desk
May 17, 2025
in Pune, पुणे शहर
Pune Balbharti To Paud
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधी महाविद्यालय आणि कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीने स्थगिती दिली आहे. समितीने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेवर निर्णय होईपर्यंत कोणतेही बांधकाम करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे रस्त्याचे काम रखडणार असल्याचे निश्चित झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या पथ विभागाकडून या रस्त्याचे नियोजन सुरू आहे, परंतु पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत.

या रस्त्याच्या विरोधात २०२४ मध्ये वेताळ टेकडी बचाव समितीने सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीकडे अर्ज केला होता. रस्त्यामुळे डोंगर उतार आणि डोंगरमाथ्याचे नुकसान होऊन पर्यावरणाची हानी होईल, असा दावा त्यांनी केला. या अर्जाची दखल घेऊन समितीने बांधकामावर स्थगिती आणली आहे. तीन महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने नागरी चेतना मंचाची याचिका फेटाळून स्थगिती उठवली होती, ज्यामुळे महापालिकेला दिलासा मिळाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

या निर्णयामुळे महापालिकेला कोणतेही बांधकाम करता येणार नसल्याचे वेताळ टेकडी बचाव समितीच्या सदस्य प्राजक्ता दिवेकर यांनी सांगितले. पर्यावरण संरक्षणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी या स्थगितीचे स्वागत केले आहे, तर वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बालभारती ते पौड फाटा रस्त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होणार असल्याने स्थानिक रहिवाशांचा सुरुवातीपासूनच याला विरोध होता. हा रस्ता करणे महत्त्वाचे कसे आहे, हे पटवून देण्यास महापालिका वारंवार अपयशी ठरली आहे. पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या या रस्त्याला नागरिकांचा विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीने दिलेल्या निर्णयामुळे नागरिकांना आणि पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे, असे राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

-खासदारांच्या बैठकीला रेटून गर्दी पण शहराध्यक्षाच्या कार्यक्रमाला माणूस दिसेना, भाजपमध्ये गृहकलहाच्या ठिणग्या?

-प्रेयसीने दिला लग्नाला नकार, त्याने थेट इनटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर टाकला

-नालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा; मुरलीधर मोहोळांचे आदेश

-भाजप खासदार मेधा कुलकर्णींना स्वपक्षीय नेत्याची धमकी, म्हणाले “आधी तिकीट कापलं आता…”

-रक्षकच निघाले भक्षक! वाघोलीत पोलिस अधिकाऱ्यानेच केला जमीन घोटाळा, चौघांवर गुन्हा दाखल

Tags: BalbhartiKarve RoadKarvenagarPaud PhatapuneRoadSupreme Courtकर्वे रोडकर्वेनगरपुणेपौड फाटाबालभारतीरस्तासर्वोच्च न्यायालय
Previous Post

खासदारांच्या बैठकीला रेटून गर्दी पण शहराध्यक्षाच्या कार्यक्रमाला माणूस दिसेना, भाजपमध्ये गृहकलहाच्या ठिणग्या?

Next Post

इंद्रायणी नदीपात्रातील ‘त्या’ ३६ बंगल्यांवर पालिकेने चालवला बुलडोझर; कोट्यावधींचे बंगले जमीनदोस्त

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
Next Post
Pimpri

इंद्रायणी नदीपात्रातील 'त्या' ३६ बंगल्यांवर पालिकेने चालवला बुलडोझर; कोट्यावधींचे बंगले जमीनदोस्त

Recommended

Pune Bhosari

पुण्यातील ‘या’ मतदारसंघात ७५०० मतदारांची नावं गायब; मतदारांची आक्रमक भूमिका

November 20, 2024
Pune Drugs Racket: पुणे पोलिसांच्या धडक कारवायानंतर नाशिक पोलीस प्रशासन सज्ज

Pune Drugs Racket: पुणे पोलिसांच्या धडक कारवायानंतर नाशिक पोलीस प्रशासन सज्ज

February 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved