Sunday, July 6, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

एरव्ही पिक्चरमध्ये बोल्ड सीन आला की बंदी घालणाऱ्या चाकणकर…; शालिनी ठाकरें आक्रमक, नेमकं काय प्रकरण?

by News Desk
May 19, 2025
in Pune, राजकारण
Rupali Chkankar And Shalini Thackeray
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) यांनी मुळशी तालुक्यातील भुकूम येथे शुक्रवारी, १६ मे २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवीच्या आई-वडिलांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत, हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून तिचा छळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता, जाऊ करिश्मा आणि दीर सुशील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता या प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही संताप व्यक्त केला जात आहे.

मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “२०२५ मध्ये अजित पवार यांच्या पक्षातील नेते हुंड्यासारख्या घृणास्पद प्रथेला खतपाणी घालत आहेत, हे अत्यंत लज्जास्पद आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेतून महिलांना १५०० रुपये द्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच नेत्यांनी हुंड्यासाठी छळ करायचा, ही नीच मानसिकता आहे,” असे शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे. शालिनी ठाकरे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

You might also like

राजकीय फायद्यासाठी हे कुटुंब एकत्र आलंय का? चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

‘विठ्ठला, सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे’, एकादशीच्या दिवशी बच्चू कडूंचा टोला

आई-बापच बनले सौदागर; ४० दिवसांच्या लेकराचा लाखो रुपयांना केला सौदा

“अजित पवार आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी. एरव्ही चित्रपटात एखादा बोल्ड सीन आला की बंदी आणि कारवाईची मागणी करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आता कुठे आहेत? ह्या प्रकरणी महिला आयोगाने तातडीने कारवाई करावी आणि जनजागृती मोहीम राबवावी अशी माझी मागणी आहे. ह्या प्रकरणी कठोर कारवाई झालीच पाहिजे”, असे शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, वैष्णवी आणि शशांक यांचा २०२३ मध्ये प्रेमविवाह झाला होता, मात्र लग्नानंतर लगेचच सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास बावधन पोलीस करत असून, राजेंद्र हगवणे सध्या फरार असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या

-Pune: हवाई दलाच्या जवानाच्या वेशात केली फसवणूक; पुणे पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

-‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून ‘वासंतिक चंदन उटी’ महोत्सव आयोजित

-इंद्रायणी नदीपात्रातील ‘त्या’ ३६ बंगल्यांवर पालिकेने चालवला बुलडोझर; कोट्यावधींचे बंगले जमीनदोस्त

-पुण्यातील ‘त्या’ बहुचर्चित रस्त्याला स्थगिती; नेमकं कारण काय?

Tags: ajit pawarncprupali chakankarShalini Thackerayअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसरुपाली चाकणकरशालिनी ठाकरे
Previous Post

पीएमपी प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; उशिरा तिकीट काढाल तर होणार कारवाई

Next Post

‘मी ब्राह्मण असल्याचा फटका, राहुल गांधींना १०० ईमेल केले…’ पुण्यात महिला नेत्या देणार काँग्रेसला सोडचिठ्ठी

News Desk

Related Posts

Chandrakant Patil
Pune

राजकीय फायद्यासाठी हे कुटुंब एकत्र आलंय का? चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

by News Desk
July 6, 2025
Bacchu Kadu
Pune

‘विठ्ठला, सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे’, एकादशीच्या दिवशी बच्चू कडूंचा टोला

by News Desk
July 6, 2025
आई-बापच बनले सौदागर; ४० दिवसांच्या लेकराचा लाखो रुपयांना केला सौदा
Pune

आई-बापच बनले सौदागर; ४० दिवसांच्या लेकराचा लाखो रुपयांना केला सौदा

by News Desk
July 6, 2025
एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेवर फडणवीसांनी केली पाठराखण तर अजित पवार म्हणाले, ‘मला…’
Pune

एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेवर फडणवीसांनी केली पाठराखण तर अजित पवार म्हणाले, ‘मला…’

by News Desk
July 4, 2025
Kondhwa
Pune

पुण्यातील डिलिव्हरी बॉय अत्याचार प्रकरणी मोठी ट्वीस्ट; आरोपी निघाला पडितीचा मित्र

by News Desk
July 4, 2025
Next Post
‘मी ब्राह्मण असल्याचा फटका, राहुल गांधींना १०० ईमेल केले…’ पुण्यात महिला नेत्या देणार काँग्रेसला सोडचिठ्ठी

'मी ब्राह्मण असल्याचा फटका, राहुल गांधींना १०० ईमेल केले...' पुण्यात महिला नेत्या देणार काँग्रेसला सोडचिठ्ठी

Recommended

पुणे पोलिसांची आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई; ६०० किलोंचा ड्रग्ज साठा जप्त

पुणे पोलिसांची आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई; ६०० किलोंचा ड्रग्ज साठा जप्त

February 20, 2024
Sharad Pawar And Uddhav Thackeray

वडगाव शेरीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा कायम; महाविकास आघाडीत रस्सीखेच

September 24, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Chandrakant Patil
Pune

राजकीय फायद्यासाठी हे कुटुंब एकत्र आलंय का? चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

July 6, 2025
Bacchu Kadu
Pune

‘विठ्ठला, सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे’, एकादशीच्या दिवशी बच्चू कडूंचा टोला

July 6, 2025
आई-बापच बनले सौदागर; ४० दिवसांच्या लेकराचा लाखो रुपयांना केला सौदा
Pune

आई-बापच बनले सौदागर; ४० दिवसांच्या लेकराचा लाखो रुपयांना केला सौदा

July 6, 2025
एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेवर फडणवीसांनी केली पाठराखण तर अजित पवार म्हणाले, ‘मला…’
Pune

एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेवर फडणवीसांनी केली पाठराखण तर अजित पवार म्हणाले, ‘मला…’

July 4, 2025
Kondhwa
Pune

पुण्यातील डिलिव्हरी बॉय अत्याचार प्रकरणी मोठी ट्वीस्ट; आरोपी निघाला पडितीचा मित्र

July 4, 2025
विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी  १०८ रुग्णवाहिकेची २४ तास आरोग्यसेवा
Pune

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची २४ तास आरोग्यसेवा

July 4, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved