पुणे : राज्याच्या राजकारणा आज मोठी घडामोड घडल्याचं पहायला मिळालं आहे. राज्यामध्ये प्रचंड बहुमताचा सरकार आल्यानंतर देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारलं होतं. यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी आणि मनातली खदखद अनेकदा बोलून दाखवली होती. अशातच आता अचनाक महायुती सरकारने भुजबळांना मंत्रिपद दिलं आहे. आज सकाळी भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले मंत्रिपद छगन भुजबळ यांना देण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. एकीकडे भुजबळांना मंत्रिपद तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्य वक्तव्याची मोठी चर्चा रंगली आहे. लक्ष्मण हाके यांनी छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात झालेल्या समावेशाचे स्वागत करत एक राजकीय वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
“छगन भुजबळ तर झाकी आहेत, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जयंत पाटील अद्याप बाकी आहेत,” असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या विलीनीकरणाच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. उशिरा का होईना भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी लागली त्यांचे स्वागत. ओबीसी दृष्टिकोनातून भुजबळ यांची उपस्थिती आवश्यक होती. मात्र, तेवढ्यावर समाधान न मानता आगामी काळातील येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ओबीसींच्या आरक्षणामध्ये होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भुजबळ यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
“भुजबळ यांच्या समावेशाने ओबीसींच्या लढ्याला नक्कीच बळ मिळेल, मात्र त्यांच्यानंतर सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील यांच्या गळ्यात देखील मंत्रीपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. या नेत्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर जर ओबीसींच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणार नसतील, तर त्यांची गाठ ओबीसी चळवळीशी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं”, असा इशारा देखील लक्ष्मण हाकेंनी यावेळी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
-JCB चा रंग पिवळाच का? ‘ही आहेत प्रमुख कारणे, नक्की वाचाच…
-मंत्रिपद मिळालं, नाराजी दूर; भुजबळांच्या मंत्रिमंडळात येण्यानं राजकीय गणिताला मिळणार बळ
-शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न, युवासेना जिल्हाप्रमुख कार्यलयात असतानाच गोळीबार
-प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
-अजितदादांचा पदाधिकारी, पोलीस मागावर अन् चित्रा वाघ म्हणाल्या ‘देवाभाऊंच्या राज्यात…’