Monday, July 20, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

सुसंस्कृत पुण्यात आणखी धक्कादायक घटना; हुंडा अन् सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

by News Desk
June 9, 2025
in Pune, पुणे शहर
सुसंस्कृत पुण्यात आणखी धक्कादायक घटना; हुंडा अन् सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : संपूर्ण राज्याला हादरुन ठेवणारी वैष्णवी हगवणे प्रकरण चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर हुंड्यासाठी विवाहित महिलांचा छळ करणारे अनेक प्रकरणं समोर आली आहेत. नुकतंच शहरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

स्वाती सुरज पाठक (वय २३) हिने हुंड्यासाठी होणाऱ्या सासरच्या त्रासाला वैतागून दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, असून या फिर्यादीवरुन पोलिसांनी तिचा पती सुरज पाठक (वय २६) याला अटक केली आहे. तसेच, सासू सुनिता पाठक (वय ४५), दीर निरज पाठक (वय २३), मामा अरुण उपाध्याय (वय ४५) आणि मामा अरविंद उपाध्याय यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती आणि सुरज यांचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नात मुलाच्या कुटुंबाने ५ लाख रुपये आणि सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली होती. ज्यापैकी १ लाख रुपये आणि ७ तोळे सोने हुंडा म्हणून घेतले गेले. लग्नानंतर हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने स्वातीला मारहाण आणि मानसिक छळ सुरू झाला. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने पती आणि सासूने गहाण ठेवून पैसे घेतले आणि ते सोडवण्यासाठी स्वातीवर ३ ते ४ लाख रुपयांची मागणी केली जात होती.

स्वातीच्या वडिलांनी तिच्या सुखी संसारासाठी आणखी ३ लाख रुपये दिले, पण तरीही सासरच्यांकडून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला गेला. या सततच्या छळाला कंटाळून ७ जून २०२५ रोजी मध्यरात्री १२:३० स्वातीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सासरच्या जाचाला वैतागून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात हुंडा प्रथेची अनेक प्रकरण समोर येत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

-लग्न केलं अन् १३चं दिवसात संसार उद्ध्वस्त, ‘राजा’ची सोनम निघाली बेवफा

-गणेशोत्सवाबाबत उच्च न्यायालयाच्या महत्वाचा निर्णय; मूर्तिकार अन् मंडळाचा मार्ग झाला मोकळा

-‘त्यांच्या मृत्यूचं खापर त्यांच्यावरच फोडून चालणार नाही’; लोकल अपघावरुन शरद पवारांनी प्रशासनाला सुनावलं

-पुण्यात शरद पवार-अजित पवार एकाच मंचावर; दादांनी पुन्हा काकांशेजारी बसणं टाळलं

-राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना काका-पुतण्याचे एकत्रित फोटो; पुण्यातील बॅनरची तुफान चर्चा

Tags: puneWedding
Previous Post

लग्न केलं अन् १३चं दिवसात संसार उद्ध्वस्त, ‘राजा’ची सोनम निघाली बेवफा

Next Post

भाजप नेत्याचा प्रताप; आधी पालिकेच्या महिला अधिकाऱ्याला त्रास, आता सहकाऱ्यांकडून अधिकाऱ्याचे कपडे काढण्याची भाषा

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
भाजप नेत्याचा प्रताप; आधी पालिकेच्या महिला अधिकाऱ्याला त्रास, आता सहकाऱ्यांकडून अधिकाऱ्याचे कपडे काढण्याची भाषा

भाजप नेत्याचा प्रताप; आधी पालिकेच्या महिला अधिकाऱ्याला त्रास, आता सहकाऱ्यांकडून अधिकाऱ्याचे कपडे काढण्याची भाषा

Recommended

मोठी बातमी: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’त मोठे बदल; शिंदेंची विधानसभेत घोषणा

आधीच ७ लाख कोटींचे कर्ज असताना ‘लाडकी बहिण योजने’चा सरकारच्या तिजोरीवर भार; अर्थविभागाकडून चिंता व्यक्त

July 26, 2024
पुण्यात महायुती विरुद्ध महाविकास आघडीच्या लढाईत रंगत; नागरिकांचा कौल कुणाच्या बाजूने? वाचा कुठे किती मतदान

पहिल्या फेरी अखेर पुण्यात काय परिस्थिती? मोहोळ की धंगेकर आघाडीवर? पहा Live निकाल

June 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved