पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाने धमाकेदार हजेरी लावली. या वळिवाच्या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह कृषी विभाग, हवामान खाते, रेल्वे विभाग आणि केंद्र सरकारचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने विकसित केलेल्या ‘महाविस्तार’ या अॅपचे उद्घाटन करण्यात आले. हे अॅप शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीविषयक माहिती, हवामान अंदाज, बाजारभाव, पीक विमा आणि शासकीय योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या अॅपमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसंबंधी गरजा एकाच व्यासपीठावर पूर्ण करता येणार असून, त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकी’दरम्यान महाडीबीटी शेतकरी योजनेंतर्गत पात्र शेतकर्यांच्या नावांची यादी जाहीर केली. शेतकऱ्यांना अनुदान, मदत आणि इतर फायद्यांचे वितरण सुलभ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट असून यासाठी कृषी विभागाने अर्ज निवड… pic.twitter.com/1Vnv6sIFEi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 21, 2025
‘खरीप हंगामासाठी बियाणे, खते आणि इतर साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यांनी शेतकऱ्यांना हवामान बदलाला अनुकूल पिकांच्या जातींचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आणि ‘फार्मर आयडी’ मोहिमेला गती देण्याचे निर्देशही दिले, जेणेकरून शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ सहज मिळू शकेल. बैठकीत बियाणे आणि खतांच्या वेळेवर पुरवठ्यासह शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यावरही भर देण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले आहे.
फडणवीसांनी खरीप हंगाम नियोजन बैठकीदरम्यान बोगस बियाण्यांच्या समस्येवर उपाययोजना जाहीर केली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राने यंदा प्रथमच एक अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या ‘साथी’ पोर्टलवर आता सर्व खत आणि बियाण्यांचे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे बियाण्यांचे मूळ उत्पादन कोठे झाले, याचा मागोवा घेता येणार आहे. यामुळे बियाण्यांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे शक्य होईल आणि बोगस बियाण्यांचे प्रकार रोखण्यास मदत होईल. या यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळण्याची खात्री होईल आणि फसवणुकीला आळा बसेल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘तीच माझ्या आयुष्यातील मोठी चूक’; वैष्णवीने मैत्रिणीला नेमकं काय सांगितलं? ऑडिओ क्लीप व्हायरल
-‘ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिलेय?’ ‘ती’ कार पाहून अजित पवारांनी विचारला होता खोचक प्रश्न
-पाकिस्तानचा नारा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल, कॉलेजने काढून टाकलेली तरुणी म्हणते…
-महिन्यात एक नाही दोन नाही तर तब्बल २५ पुरुषांशी केलं लग्न, अखेर ‘त्या’ रात्री पितळ उघड पडलंच