पुणे : विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर म्हणून जगभर ओळख असणाऱ्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारीने चांगलाच उच्चांक गाठला आहे. पुण्यातील आंबेगावमधील मानवतेची हद्द गाठणारी एक भयंकर घटना समोर आली आहे. कैलास देशमुख (वय ४५, आंबेगाव बु.) या नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नराधमाला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. हा अत्याचार एप्रिल २०१९ पासून गेल्या सहा वर्षांपासून सुरू होता, असे तपासात समोर आले आहे. नराधम कैलास देशमुख आणि पीडित मुलगी एकाच सोसायटीत राहत होते. सोसायटीतील अनेक अल्पवयीन मुले देशमुख यांच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जात असत. या संधीचा गैरफायदा घेत देशमुखने पीडित मुलीला फूस लावून तिचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर तिच्याशी मैत्री करून चॅटिंग सुरू केले. या फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने मुलीवर शरीर सुखाची मागणी केली आणि अनेकदा तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या अत्याचाराने मुलीच्या मनावर गंभीर परिणाम झाला, परंतु भीतीपोटी ती गप्प राहिली.
देशमुखने पीडित मुलीचा सोसायटी परिसरात पाठलाग करूनही अनेकदा तिच्यावर अत्याचार केले. अखेरीस मुलीने हा जाच सहन न होऊन आपल्या आईला सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या आईने तात्काळ आंबेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत कैलास देशमुखला अटक केली. या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करून तपास सुरू केला आहे. देशमुखने आणखी मुलींवर असे अत्याचार केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या घटनेमुळे आंबेगाव परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सोसायटीतील पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, आरोपीच्या मोबाइल आणि सोशल मीडिया खात्याचीही तपासणी केली जाणार आहे. या घटनेने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
-राज्याला अवकाळी पावसाचा फटका; मुख्यमंत्र्यांनी शेकऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
-‘तीच माझ्या आयुष्यातील मोठी चूक’; वैष्णवीने मैत्रिणीला नेमकं काय सांगितलं? ऑडिओ क्लीप व्हायरल
-‘ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिलेय?’ ‘ती’ कार पाहून अजित पवारांनी विचारला होता खोचक प्रश्न
-पाकिस्तानचा नारा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल, कॉलेजने काढून टाकलेली तरुणी म्हणते…