पुणे : अनेकजण आता पुण्याजवळ असणाऱ्या ग्रामीण भागातील लोणावळा परिसरात असणाऱ्या पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन करत आहेत. कडाक्याच्या उन्हानंतर थंड वातावरण आणि फुललेला निसर्ग पाहण्यासाठी लाखो पर्यटक गर्दी करत असतात. अशातच आता एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना डॅम यांसारख्या वर्षाविहारासाठी प्रसिद्ध ठिकाणांवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घालण्यात आली आहे.
लोणावळ्यात पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होते, परंतु यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढतो. गेल्या वर्षी धबधब्याजवळील पाण्याच्या प्रवाहात एक कुटुंब वाहून गेल्याची दु:खद घटना घडली होती. अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने यंदा खबरदारी म्हणून ७ जून ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पवना डॅम, कार्ला लेणी, टायगर पॉईंट यांसह अनेक ठिकाणी प्रवेशबंदी लागू केली आहे.
या कालावधीत बंदी असलेल्या ठिकाणी गेलेल्यांवर कायदेशीर कारवाई होईल. पर्यटकांनी आपली सुरक्षा आणि कायद्याचे पालन करत पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पर्यटकांसाठी महत्वाच्या सूचना
- प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे
- बंदी असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे
- परवानगी असलेल्या ठिकाणी देखील खबरदारी बाळगावी
- हवामानाच्या परिस्थितीनुसार पर्यटन नियोजन करावे
ही ठिकाण राहणार बंद
- एकविरा देवी मंदिर
- कार्ला लेणी
- भाजे लेणी व धबधबा
- लोहगड किल्ला
- विसापूर किल्ला
- तिकोणा किल्ला
- टायगर पॉइंट
- लायन्स पॉइंट
- शिवलिंग पॉइंट
- पवना डॅम
महत्वाच्या बातम्या
-पालिकेची निवडणूक होणार चार सदस्यीय प्रभाग रचनेत; ४२ प्रभागांत किती नगरसेवक?
-शिंदेसेना पुण्यात वेगळी चूल मांडणार? धंगेकरांकडून एकट्याने लढण्याचा आग्रह, शिंदेंचा निर्णय काय?
-सुसंस्कृत पुण्यात आणखी धक्कादायक घटना; हुंडा अन् सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल
-लग्न केलं अन् १३चं दिवसात संसार उद्ध्वस्त, ‘राजा’ची सोनम निघाली बेवफा