पुणे : श्री. संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात पुणे-सोलापूर रस्त्यावर दोन भाविकांचे मोबाइल चोरीला गेले. याप्रकरणी वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. पालखीचे रविवारी (२२ जून) शहरातून प्रस्थान झाले. रविवारी सकाळी पालखी दर्शनासाठी पुणे-सोलापूर रस्त्यावर भाविकांची गर्दी होती.
भैरोबा नाला परिसरात सकाळी सव्वाआठच्या सुमारास शिवम कमलेश पांडे (वय २६, रा. सुयोग अपार्टमेंट, ओंध) यांचा १० हजारांचा मोबाइल चोरट्यांनी चोरला. त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलीस हवालदार गाढवे तपास करत आहेत.
त्याचवेळी, हडपसर गाडीतळ परिसरात सकाळी साडेनऊच्या सुमारास नितीन साळुंखे (वय ४२, रा. घोटवडे, ता. मुळशी) यांचा ९ हजारांचा मोबाइल खिशातून चोरीला गेला. त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलीस हवालदार गव्हाणे तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
-हुंड्याच्या छळामुळे उच्चशिक्षित महिलेने केली आत्महत्या, सासूविरुद्ध गुन्हा दाखल
-पुण्यात धक्कादायक प्रकार; मौत्रिणसोबत कारमध्ये बसलेल्या तरुणाला खाकीचा धाक दाखवला अन्…
-पुण्यात व्यावसायिकाने संपवले जीवन, धक्कादायक कारण आले पुढे
-हिंदी भाषा सक्तीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांना कायदेशीर नोटीस