Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

PMC Election: आंदेकर परिवाराची एंट्री, अजित पवारांची ‘तिरकी चाल’; भाजपचा फॉर्म्युला वापरून उमेदवारी

by News Desk
December 27, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
PMC Election: आंदेकर परिवाराची एंट्री, अजित पवारांची ‘तिरकी चाल’; भाजपचा फॉर्म्युला वापरून उमेदवारी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय वातावरण तापले असून कुख्यात गुंड बंडू आंदेकर कुटुंबातील दोन महिलांनी थेट निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःच्या नातवाच्या खूनाच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेल्या बंडू आंदेकर यांच्या परिवाराकडून लक्ष्मी आंदेकर तसेच दिवंगत नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर यांनी प्रभाग क्रमांक २३ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज दोघींनीही कडेकोट पोलीस बंदोबस्तात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अर्ज दाखल केले.

या दोन्ही महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी देण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परिवाराला थेट राष्ट्रवादीच्या नावाने उमेदवारी दिल्यास टीकेचा भडिमार होऊ शकतो, याची पूर्ण जाणीव ठेवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक ‘मोठी आणि चतुर खेळी’ केल्याची माहिती पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळत आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

या खेळीनुसार प्रभाग क्रमांक २३ मधील या जागा मित्र पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) यांना सोडण्यात येणार आहेत. अधिकृतपणे उमेदवार खरात गटाचे असतील, मात्र निवडणूक चिन्ह मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘घड्याळ’ असणार आहे. त्यामुळे टीकेपासून अंतर ठेवत मतांची गणिते आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून होत असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे २०१७ साली भाजपने हाच फॉर्म्युला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) सोबत वापरला होता. तेव्हा आरपीआयचे उमेदवार भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढले होते. आता त्याच धर्तीवर राष्ट्रवादीनेही ‘मित्र पक्ष – आपले चिन्ह’ हा प्रयोग राबवल्याचे चित्र आहे.

दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परिवाराला अप्रत्यक्षपणे उमेदवारी देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर विरोधकांकडून जोरदार टीका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भवानी पेठेत घडलेली ही घडामोड पुण्याच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण करणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे महापालिकेसाठी महायुती फिक्स? मुंबईत फडणवीस–सामंतांची बैठक, गणेश बिडकरांची पोस्ट चर्चेत

-ठाकरे सेना-मनसे युतीत पुणे महापालिकेसाठी फॉर्म्युला ठरला; जागावाटप जवळपास निश्चित!

-राजीनाम्यानंतर प्रशांत जगताप काँग्रेसचा हात धरणार? पुण्याचं राजकीय समीकरण बदलणार

-पुणे महापालिका निवडणूक: भाजपविरोधात ‘मेगा आघाडी’ची जोरदार तयारी; जागावाटपांत दोन्ही शिवसेनेची परवड!

-गणेश बीडकरांचा स्तुत्य उपक्रम; महा ई-सेवा केंद्रातून २७ हजार नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ

Tags: Bandu AndekarBhawani PethLaxmi AndekarpuneSonali Andekarपुणेपुणे महापालिका निवडणूक
Previous Post

पुणे महापालिकेसाठी महायुती फिक्स? मुंबईत फडणवीस–सामंतांची बैठक, गणेश बिडकरांची पोस्ट चर्चेत

Next Post

महापालिका निवडणुकीने पुण्यात वातावरण तापले, भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; अजितदादांसह काँग्रेसला धक्का

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
Next Post
महापालिका निवडणुकीने पुण्यात वातावरण तापले, भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; अजितदादांसह काँग्रेसला धक्का

महापालिका निवडणुकीने पुण्यात वातावरण तापले, भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; अजितदादांसह काँग्रेसला धक्का

Recommended

फडणवीसांचे पुणे दौरे वाढले, शरद पवारांना देणार मोठा धक्का; बड्या नेत्याचा मुलगा लागला गळाला?

September 23, 2025
पंतप्रधान मोदींचा सत्कार करताना मोहोळ अचानक थांबले अन् सुनेत्रा पवारांना पुढे बोलवलं, पहा काय झालं

April 29, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved