Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

गणेश बिडकरांची सकाळी जनसंपर्क मोहीम; शाहू उद्यानात ज्येष्ठ नागरिक, महिला अन् खेळाडूंशी हृदयस्पर्शी संवाद

by News Desk
January 10, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
Ganesh Bidkar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ चे भाजप उमेदवार गणेश बिडकर यांनी सोमवार पेठेतील शाहू उद्यान येथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला मतदार आणि स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. या माध्यमातून त्यांनी प्रभागातील विविध समस्या ऐकून घेतल्या आणि भविष्यातील विकास योजनांबाबत रोडमॅप मांडला.

मॉर्निंग वॉकदरम्यान गणेश बिडकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत विशेष चर्चा केली. ज्येष्ठांसाठी सुरक्षित वातावरण, अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत करत, या दिशेने पुणे महापालिकेच्या माध्यमातून ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले. यामुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त झाले.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

यावेळी मॉर्निंग वॉकला आलेल्या महिला मतदारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाबाबत समाधान व्यक्त केले. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर शहरातील आणि प्रभागातील महिलांसाठी आणखी विविध महिला-केंद्रित योजना राबवण्याचा निर्धार बिडकर यांनी व्यक्त केला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढील काळात विशेष प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, शाहू उद्यानात बॅडमिंटन सराव करणाऱ्या खेळाडूंशीही गणेश बिडकर यांनी संवाद साधला. त्यांच्यासोबत काही वेळ खेळण्याचा आनंद लुटताना, प्रभागात खेळाडूंसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, स्थानिक स्तरावर स्पर्धा आयोजित करणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले.

या उपक्रमात प्रभागातील इतर उमेदवार आणि स्थानिक कार्यकर्तेही उपस्थित होते. गणेश बिडकर यांच्या या सकाळच्या जनसंपर्क दौर्‍याला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, प्रभागातील मतदारांमध्ये त्यांच्या सक्रिय सहभागामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बालेवाडीतील गोल्डन ट्रेलीज सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांचा लहू बालवडकरांना जाहीर पाठिंबा

-अजित पवारांनी मोफत बस, मेट्रोचं आश्वासन तर दिलं पण गुन्हेगारीबाबत प्रश्न विचारताच दिली उडवाउडवीची उत्तरं

-प्रभाग २४ साठी आरोग्याचा भक्कम किल्ला; गणेश बिडकरांच्या नेतृत्वात कमला नेहरू रुग्णालयाचा कायापालट

-‘हातात कमळ, विकासाचं व्हिजन’; लहू बालवडकरांच्या प्रचाराला प्रभाग ९ मध्ये उस्फूर्त प्रतिसाद

-निवडणूक काळातही अविरत स्वच्छता, बाप्पु मानकरांच्या कृतीने वेधले सर्वांचे लक्ष

Tags: bjpGanesh Bidkarpuneगणेश बीडकरपुणेभाजप
Previous Post

बालेवाडीतील गोल्डन ट्रेलीज सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांचा लहू बालवडकरांना जाहीर पाठिंबा

Next Post

‘लोकभावना लक्षात घेऊनच कस्तुरबा आणि आंबेडकर वसाहतीचा विकास करणार’- सनी निम्हण

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
Sunnt Nimhan

'लोकभावना लक्षात घेऊनच कस्तुरबा आणि आंबेडकर वसाहतीचा विकास करणार'- सनी निम्हण

Recommended

Aba Bagul

एकनाथ शिंदेंची रॅली अन् हजारो लाडक्या बहिणींची गर्दी, आबा बागुलांच्या प्रभागात घुमला शिवसेनेचा आवाज

January 9, 2026
sandip Gill

शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांच्या अंगावर ओतलं पेट्रोल अन्…

March 9, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved