Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“मोदी जसे ‘चहा’ची स्टोरी सांगायचे आता तसं अजित पवार ‘अंडी विक्री’ची सांगतात”

by News Desk
February 26, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
“मोदी जसे ‘चहा’ची स्टोरी सांगायचे आता तसं अजित पवार ‘अंडी विक्री’ची सांगतात”
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आवाहन करत पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत भाजप सोबत जाण्याचे कारण स्पष्ट केले आहे. त्यांच्या या पत्रानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. यावरुन आता महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.

अजित पवारांनी कितीही पत्र व्हायरल केलं, कितीही आपली स्पष्टता सांगण्याचा प्रयत्न केला तरीही महाराष्ट्रातील जनता ते काही ऐकणार नाही. भाजप सोबत जे जे लोक गेले आहेत त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. भाजपला निवडून पाठवलं ही महाराष्ट्राच्या जनतेकडून चूक झाली असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

भाजपचे यापुर्वी कधीही इतके आमदार निवडून आले नाहीत. याच्याच जोरावर भाजपने राज्यात कसा खेळ खेळला. महाराष्ट्रातील शाहू, फुले, आंबेडकर विचाराला काळिमा लावण्याचं पाप भाजपने केलं हे महाराष्ट्राची जनता ओळखत आहे. भाजपचे आमदार सरळ म्हणत आहेत मराठा समाजावर फडणवीसांचे उपकार आहेत. पण उपकार कोणाचे कोणावर आहेत हे निवडणुकीत समजवतील, अशा शब्दात नाना पटोलेंनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.

अजित पवार यांचे पत्र व्हायरल होत आहे. मात्र, अजित पवारांनी कितीही पत्र व्हायरल केलं तरी जनतेला हे पचनी पडणार नाही. त्यांना याची फळं भोगावी लागणारच आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे चहाची स्टोरी सांगायचे आता तसं अजित पवार अंडी विक्री करत होते, अशी स्टोरी सांगताहेत. मात्र, जनता आशा भूलथापांना बळी पडणार नाही, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

नाना पटोलेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे-

  • भाजप आमदार म्हणतात की मराठा समाजावर उपकार आहेत. आता भाजपचे मराठा समाजावर किती उपकार आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल. जनता धडा शिकवेल.
  • मोदी जसे चहाची स्टोरी सांगायचे आता तसं अजित पवार अंडी विक्री करत होते अशी स्टोरी सांगत आहेत.
  • मनोज जरांगे यांनी आम्हाला आधी शिव्या घातल्याच की मग फडणवीसांना शिव्या घातल्यावर लगेच कसे पडसाद उमटू लागले. आम्ही काय माणसं नाही का? आम्ही शिव्या दिल्या याचं समर्थन करत नाही. पण चित्र कसं आणि का बदलले हे सर्वांसमोर आहे.
  • फडणवीस हे गृहमंत्री आहेत, आज ड्रग्स माफियाचे जाळे पसरले आहेत. ड्रग्स माफिया काय जावई आहेत का? गुटखा विक्री होते, विक्री करणारे जावई आहेत का? मग अशावेळी जरांगे यांनी हत्येच्या कटाचा आरोप केला, याची चौकशी व्हायला हवीच.
  • बाजार समित्या उद्वस्थ करायचं धोरण भाजपने स्वीकारलं आहे. त्यामुळं या कायद्या विरोधात बाजार समित्या बंद आहेत.
  • मविआ बैठक उद्या होईल, प्रकाश आंबेडरकरांना उद्या जमत नसेल तर २८ फेब्रुवारी ला भेटू.
  • या लोकसभेला अधिक महिलांना उमेदवारी दिली जाईल, ते दिसेल.
  • नाना पटोले यांची एक चूक आहे, माझ्या नेतृत्वात अधिक जागा मिळत आहेत, मी प्रत्येक निवडणूक जिंकतोय. पण ती चूक असेल तर ती चूक मी करत राहीन आणि काँग्रेसला सत्तेत आणायचा प्रयत्न करत राहीन. ही चूक मी नेहमी करायला तयार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-लोकसभा निवडणुकीबाबत सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या…

-“शरद पवारांमुळेंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही, बारामती २३ मार्चला मोर्चा…”

-“नवऱ्याला संसदेत अलाऊड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं”

-ठरलं! बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच; भाजपच्या बड्या नेत्याने सांगितलं A टू Z गणित

-धंगेकरांनी आव्हान देऊ नये, त्यांचा पराभव करायला फडणवीसांचा हा चेलाच भारी- काकडे

Tags: ajit pawarbjpCongressDevendra FadnavisGrand AllianceMaratha ReservationNana Patolesharad pawarअजित पवारकाँग्रेसदेवेंद्र फडणवीसनाना पटोलेभाजपमराठा आरक्षणमहायुतीशरद पवार
Previous Post

लोकसभा निवडणुकीबाबत सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या…

Next Post

लेकीसाठी बापानं कंबर कसली; अजित पवारांना शह देण्यासाठी बोलवली महत्वाची बैठक

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
लेकीसाठी बापानं कंबर कसली; अजित पवारांना शह देण्यासाठी बोलवली महत्वाची बैठक

लेकीसाठी बापानं कंबर कसली; अजित पवारांना शह देण्यासाठी बोलवली महत्वाची बैठक

Recommended

Sanjay Rathod

…अन् मंत्री संजय राठोडांना मिळाला दिलासा; तरुणीच्या मृत्यूची केस बंद!

January 24, 2025
Avinash Bhosale

अखेर बिल्डर अविनाश भोसलेंना जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; नेमकं काय प्रकरण?

August 29, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved