Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
in Pune, पुणे शहर
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील स्वर्णाक्ष ढोल-ताशा ध्वज पथकाच्या गणेशोत्सव २०२६ निमित्त सराव शुभारंभ व वाद्यपूजन सोहळा मा.  मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून पुण्याच्या सांस्कृतिक अस्मितेचा, शिस्तीचा, परंपरेचा आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव असल्याचे सांगितले. ढोल-ताशांचा गजर ही पुण्याची सांस्कृतिक ओळख असून, त्यातून युवकांमध्ये शिस्त, समर्पण, संघभावना आणि संस्कृतीप्रती असलेली निष्ठा वृद्धिंगत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, महापौर मंजुषा नागपुरे, नगरसेवक सचिन मोरे, नगरसेवक प्रसन्न जगताप, नगरसेवक सुनील पांडे, नातूबाग मंडळाचे अमित कंक, ढोल-ताशा महासंघाचे उपाध्यक्ष शिरीष थिटे, मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळाचे निलेश वकील, सिने अभिनेते रमेश परदेशी तसेच अमय खाडीलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

You might also like

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

कार्यक्रमादरम्यान स्वर्णाक्ष ढोल-ताशा ध्वज पथकाच्या २०२५-२६ या वर्षाच्या कार्यअहवालाचे अनावरण मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. पथकाच्या वर्षभरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्याचा आढावा या कार्यअहवालातून मांडण्यात आला. पथकाचे सचिव प्रणव गंजीवाले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून पथकाची वाटचाल व आगामी उपक्रमांची माहिती दिली. पथकाचे अध्यक्ष श्री. मयुरेश कोद्रे यांच्या नेतृत्वाखाली सर्व वादकांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि आकर्षक वादन सादर करत पुण्याच्या समृद्ध ढोल-ताशा परंपरेचा देखणा आविष्कार घडविला.

कार्यक्रमातील आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे महापौर मंजुषा नागपुरे यांनी स्वतः ढोल वादन करत पथकातील वादकांसमवेत वादनाचा आनंद घेतला. त्यांच्या सहभागामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी गणेशोत्सवासाठी स्वर्णाक्ष ढोल-ताशा ध्वज पथक सज्ज असून, शिस्त, संस्कार, परंपरा आणि उत्कृष्ट वादनाच्या बळावर यंदाही पुणेकरांसमोर दिमाखदार सादरीकरण करण्याचा पथकाचा निर्धार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Previous Post

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

News Desk

Related Posts

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Please login to join discussion

Recommended

Amol Kolhe

‘महाविकास आघाडीची २१८ जागांवर एकवाक्यता’ पण हडपसरचं काय? अमोल कोल्हे म्हणाले…

October 15, 2024
Sharad Pawar Bharat Shah

इंदापूरात राजकीय घडामोडींना वेग! शरद पवारांनी घेतली भरत शहांची भेट, प्रवीण माने माघार घेणार?

November 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved