Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

विकसित पुण्यासाठी मुरलीधर मोहोळांचे संकल्पपत्र! शहराच्या विकासासाठी मांडला रोडमॅप

by News Desk
May 9, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
विकसित पुण्यासाठी मुरलीधर मोहोळांचे संकल्पपत्र! शहराच्या विकासासाठी मांडला रोडमॅप
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : भविष्यातील विकसीत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक विकासाचा संकल्प महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे संकल्प पत्र बुधवारी प्रकाशित करण्यात आले. यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, आमदार आशिष देशमुख, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसेचे नेते बाबु वागस्कर,आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनावणे,  लहुजी  क्रांती सेनेचे नितीन वायदंडे, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, उपस्थित होते.

विकासाच्या संकल्पाबाबत बोलताना, “पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आखण्यात आला आहे. पायाभूत विकास, पर्यावरण, वाहतुक, नवीन रस्ते, अशा योजनांसाठी प्रयत्न करणार पीएमपीच्या ताफ्यात इलेट्रीक बसची संख्या वाढविण्यात येईल. मेट्रोच्या विस्ताराचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कार्यालय २४ तास खुले असणार असल्याचं” पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सक्षम आणि वेगवान बनविणार. शहरातील नगर रस्ता, सातारा रस्ता, जुना मुंबई-पुणे रस्ता, सोलापूर रस्ता, शिवाजीनगर ते हिंजवडी, तसेच कोथरूड उपनगर या मार्गांवर विस्तारित मेट्रो मार्गांची आखणी व्हावी आणि हे मार्ग जलदगतीने पूर्ण व्हावेत, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

दौंड-पुणे-तळेगाव-लोणावळा ईएमयू, पुणे-दौंड लोकल सेवा आणि नाशिक-पुणे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार. पुणे स्टेशन, शिवाजीनगर, खडकी, हडपसर स्टेशनचा आधुनिक पद्धतीने विकास करणार. – लोहगाव, पुणे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविणार. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’कडे (एनएचएआय) पुणे-नगर रस्त्यावर येरवडा ते शिक्रापूरदरम्यान सहा पदरी उड्डाणपुलाबाबत पाठपुरावा करणार.

मा. प्रदेश अध्यक्ष @cbawankule यांच्या हस्ते पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
मा. @ChDadaPatil , महायुतीचे उमेदवार @mohol_murlidhar , @DheerajGhate यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.… pic.twitter.com/NxT9TqkAtE

— Dr. Medha Kulkarni (Modi Ka Parivar) (@Medha_kulkarni) May 9, 2024

पुणे शहरासाठी संकल्प

समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने पूर्ण करणार. पुण्यातील जुने तलाव, विहिरी, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणार.नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करून पूर्ण क्षमतेने चालविणार. पुण्याभोवतालच्या टेकड्या, वनक्षेत्राचे कसोशीने संरक्षण करणार. वेस्ट टू वेल्थ’च्या माध्यमातून कचर्‍यातून ऊर्जानिर्मिती, खत उत्पादन अशा पर्यावरणपूरक कार्यक्रमांची अंमलबजावणी करणार. मराठीस अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार.

कचरामुक्त पुण्यासाठी शहराच्या विविध भागांत प्लॉगेथॉन उपक्रम नियमित राबविणार, ई-कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रकल्प उभारणार. सोसायट्या, सार्वजनिक ठिकाणे, व्यावसायिक संकुले येथे सौरऊर्जा वापराला प्रोत्साहन देणार. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ (एम्स) पुण्यात उभारण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेनुसार पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार.

महापालिकेचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय’ पूर्ण क्षमतेने सुरू करणार, महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालय उभारणार. रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना होणार्‍या त्रासापासून सुरक्षा मिळावी, याकडे विशेष लक्ष देणार. सुधारित नियमावली वापरून ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’अंतर्गत झोपडपट्टीधारकांना सदनिका देणार.

रिक्षा सेवेसाठी शासकीय पातळीवर ॲप विकसित करणार. विविध कंपन्यांच्या ‘सीएसआर’ निधीतून तरुणांसाठी स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम राबविणार. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे क्रीडा विद्यापीठाच्या उभारणीसाठी प्रयत्न करणार. विद्यार्थी व शिक्षण संस्थांना पुणे परिसरातील कंपन्या हॉस्पिटल, आयटी सेक्टरसह अन्य उद्योगांशी जोडणार.

संगमवाडी येथील आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळाच्या कामाला गती देणार. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या भिडे वाड्याचे स्मारक होण्यासाठी पाठपुरावा करणार. पुरातत्व खात्याच्या नियमांमुळे वारसास्थळांच्या परिसरातील बांधकामांत अडथळा येऊ नये यासाठी पाठपुरावा करून निश्चित धोरण आखणार.

पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट पुणे महापालिकेत विलीन करणे व या परिसरातील ‘एफएसआय’ वाढविणे यासाठी पाठपुरावा करणार. पुण्यातील गणेशोत्सव परंपरा आणि नवतेचा संगम साधत अधिक वैभवशाली होण्यासाठी विचारविनिमय करणार. शहरातील जागांच्या योग्य आणि न्याय्य वापरासाठी धोरण आखणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बारामती मतदान प्रक्रियेनंतर अजित पवारांचा मोर्चा शिरुरकडे; उरुळी कांचनमधील सभेतून अमोल कोल्हेंना फटकारे

-Latest Entertainment News: अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे दोन वर्षानंतर ब्रेकअप; कारण आले समोर…

-मतदारांसाठी मोहोळांकडून प्रभावी यंत्रणा; पुणेकरांनी घेतल्या दोन लाख ‘व्होटिंग स्लीप’

-दत्तात्रय भरणेंची मतदान केंद्रावर शिवीगाळ; व्हिडीओ व्हायरल, वाचा भरणे काय म्हणाले?

-बारामती मतदारसंघातून मतदान करताना ईव्हीएमवर ‘कमळ’ चिन्ह नाही म्हणून आजोबा आक्रमक

Tags: bjpLocalLoksabha ElectionMurlidhar MoholpunePune CityRoadTrainWaterपाणीपुणेपुणे शहरभाजपमुरलीधर मोहोळरस्तारेल्वेलोकललोकसभा निवडणूक
Previous Post

बारामती मतदान प्रक्रियेनंतर अजित पवारांचा मोर्चा शिरुरकडे; उरुळी कांचनमधील सभेतून अमोल कोल्हेंना फटकारे

Next Post

“नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय”; शिरुरच्या सभेत अजित पवारांचा कोल्हेंवर हल्लबोल

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
“तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट खासदार”; अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर निशाणा

"नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय"; शिरुरच्या सभेत अजित पवारांचा कोल्हेंवर हल्लबोल

Recommended

Swami Samarth : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनी वाचा ‘हे’ अनमोल विचार; बदलून जाईल तुमचं आयुष्य

Swami Samarth : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनी वाचा ‘हे’ अनमोल विचार; बदलून जाईल तुमचं आयुष्य

April 10, 2024
शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी फरार; दोन पोलीसांचे निलंबन

शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी फरार; दोन पोलीसांचे निलंबन

February 14, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved