पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दरम्यान शहरात चार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमुळे संबंधित परिसरात पुणे पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले असून, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. याचा फटका पुणेकरांना सहन करावा लागत आहे.
अमित शहा आज (४ जुलै २०२५) पुणे दौऱ्यावर आहेत. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी शहा यांनी प्रशिक्षणार्थी कॅडेट आणि सैन्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
शहा यांच्या दौऱ्याचा भाग म्हणून ते कोंढवा बुद्रुक येथील जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरला भेट देणार आहेत. तसेच, बाळासाहेब देवरस रुग्णालयाची पाहणी आणि पीएमएचआरसी हेल्थ सिटीच्या भूमिपूजन समारंभासही ते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यामुळे पुणे शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
अमित शहा दुपारी १२:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत मंतरवाडी फाटा ते खडी मशीन चौक आणि कात्रज चौकादरम्यान सर्व जड आणि मालवाहतूक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच, बंडगार्डन वाहतूक विभागांतर्गत मोर ओढा ते सर्किट हाउस आणि आयबी चौकादरम्यानची एकेरी वाहतूक आवश्यकतेनुसार दुतर्फा केली जाईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
-अमित शहा पुणे दौऱ्यावर अन् झाडाझडतीत तरुणाकडे सापडली पिस्तुल, जिवंत काडतुसे
-‘तुझं कुठं लफडं आहे का?’; शाळेत शिक्षक देत होता मुली पटवण्याचे धडे
-प्रसाद तामदार भोंदूच्या आश्रमात सापडली ‘त्या’ गोळ्यांची पाकिटं, गोळ्या नेमक्या कोणासाठी?
-धक्कादायक! डिलिव्हरी बॉयनं घरात घुसून बलात्कार केला मग सेल्फी काढला अन् म्हणाला, ‘मी…’
-पुण्यातील भोंदूबाबा प्रसाद द्यायचा, मठात भक्ताला झोप लागताच अन् भक्तांसोबत…