Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Uncategorized

चंद्रकांत पाटलांचा मास्टरस्ट्रोक, एका दगडात मारले अनेक पक्षी; खंद्या समर्थकावर मोठी जबाबदारी

by Team Local Pune
August 22, 2024
in Uncategorized, पुणे शहर, राजकारण
चंद्रकांत पाटलांचा मास्टरस्ट्रोक, एका दगडात मारले अनेक पक्षी; खंद्या समर्थकावर मोठी जबाबदारी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे: विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यात शिल्लक असल्याने संपूर्ण राज्यामध्ये इच्छुक तसेच विद्यमान आमदार कामाला लागले आहेत. पुणे शहरातील आठही मतदार संघात सध्या इच्छुकांचे पीक जोमात असल्याचा पाहायला मिळत आहे. भाजपचे पहिल्या फळीतील नेते असणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात देखील भाजपमधूनच इच्छुक पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचा धडका लावत रान उठवले आहे. दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील यांनी मास्टरस्ट्रोक लावत आपल्या खंद्या समर्थकावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. अशातच अमोल बालवडकर यांनी बंडाची भूमिका घेतल्याने भाजपकडूनही आता कार्यकर्त्यांना ताकद देण्यात येत आहे. याठिकाणी गणेश कळमकर, राहुल कोकाटे, लहु बालवडकर, प्रल्हाद सायकर, ज्योती कळमकर, सायली सायकर, प्रकाश तात्या बालवडकर हे चंद्रकांत पाटलांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. यातच आता पुणे शहराचे चिटणीस लहू बालवडकर यांच्याकडे भाजपने आता ‘कोथरूड उत्तर मंडळ संयोजक’ पदाची जबाबदारी सोपविली आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी यासंदर्भात एक पत्र काढून त्यांची नियुक्ती केली आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

पुण्यातील झपाट्याने विकसित झालेल्या बालेवाडी-बाणेर, सुस- म्हाळुंगे, औंध भागामध्ये लहू बालवडकर भाजपचे एकनिष्ठ म्हणून काम करीत आहेत. लोकसभा निवडणूकीच्या दरम्यानही त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना अधिकचे मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम केलं आहे. यातच आता अमोल बालवडकर यांना शह देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी लहू बालवडकर यांना बळ देल्याच दिसत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये कोथरूड मतदार संघात आपली पकड मजबूत केल्याचं दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनाच भाजपकडून उमेदवारी दिली जाणार हे निश्चित आहे. कोथरूड मधून इच्छुक असणाऱ्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा तर मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे खासदार होत थेट केंद्रात राज्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे पाटील यांच्या पुढे इच्छुकांचे आव्हान नसणार असे मानले जात होते, मात्र अमोल बालवडकर यांनी अप्रत्यक्षपणे बंड केल्याचं दिसत आहे. दरम्यान, आता भाजपने लहू बालवडकर यांची नियुक्ती करून शह देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात शहरात कशा पद्धतीच्या राजकीय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags: कोथरूड विधानसभाभाजपमंत्री चंद्रकांत पाटीलमाजी नगरसेवक अमोल बालवडकरलहू बालवडकर
Previous Post

मोठी बातमी: हर्षवर्धन पाटलांनी तुतारी चिन्हावर लढण्याच्या चर्चेवर सोडलं मौन, म्हणाले…

Next Post

‘सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर मी पुण्यात…’ एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा इशारा

Team Local Pune

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
Sharad Pawar

'सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर मी पुण्यात...' एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा इशारा

Recommended

Sharad Pawar And Ashwini Jagtap

शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबच्या चर्चेवर अश्विनी जगताप म्हणाल्या, ‘मी शरद पवारांना…’

September 19, 2024
Supriya Sule

बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत आले तर? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महाराष्ट्रासाठी चांगल्या लोकांनी…’

August 10, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved