Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

सगेसोयऱ्यांचा गोतावळ्यामुळे शिवाजी मानकरांना ताकद; पुणे लोकसभेसाठी करणार दावेदारी प्रबळ

by News Desk
February 29, 2024
in Pune, पुणे शहर
सगेसोयऱ्यांचा गोतावळ्यामुळे शिवाजी मानकरांना ताकद; पुणे लोकसभेसाठी करणार दावेदारी प्रबळ
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे सध्या देशभरात वाहत आहेत. पुणे लोकसभेसाठी देखील इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याने वाढत्या उन्हासोबत शहरातील राजकीय वातावरण देखील तापताना दिसत आहे. भाजपकडून सुरुवातीला माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, माजी सचिव सुनील देवधर यांची नावे चर्चेत होती. यामध्ये आता शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे वलय असणारे शिवाजी माधवराव मानकर यांनी उघडपणे आपणही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगत मोठा ट्वीस्ट निर्माण केला आहे.

सत्ताधारी भाजपने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून पक्षातील उमेदवारीची गणिते सोपी केल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता लोकसभेसाठी इच्छुकांमध्ये नक्की कोण बाजी मारणार याबाबत चर्चा आणि अंदाज बांधला जात आहे. राज्यसभेला मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने ब्राम्हण समाजाला प्रतिनिधित्व दिल्याने सुनील देवधर यांच्या दावेदारीला लगाम लागलीय. तर मोहोळ, मुळीक, काकडे आणि शिवाजी मानकर असे मराठा चेहरे आता प्रमुख रेसमध्ये आहेत. मानकर यांच्या रूपाने लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा क्षेत्रात गणगोताचे मोठे जाळे असणारा प्रमुख दावेदार भाजपमध्ये पुढे आला आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

मानकरांची खरी ताकद, त्यांचे सहाही विधानसभा मतदार संघात असलेले गणगोताचे जाळे

शिवाजी मानकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे बंधू आहेत. तर मुळचे नारायण पेठेतील असल्याने शहराच्या मध्यवस्ती भागात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. बालेवाडीतील बालवडकर, कोथरूड मधील बांदल-सुतार, कसबा मध्ये मानकर, पर्वतीमध्ये कदम, वडगाव शेरीमध्ये गलांडे, पठारे, विश्रांतीवाडीमध्ये टिंगरे, शिवाजीनगरमध्ये बहिरट, निम्हन या सर्व राजकारणात त्या-त्या भागात प्रभाव असलेल्या घराण्यांशी जवळचे नातेसंबंध हा शिवाजी मानकर यांच्यासाठी सर्वात मोठा ‘प्लस पॉइंट’ आहे. तसेच त्यांचा स्वतःचा मोठा मित्र परिवार आहे. मानकर यांना भाजपने उमेदवारी दिल्यास त्यांचे मित्र आणि त्यांचा सहा मतदार संघातील गोतावळा त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे इतर इच्छुकांच्या तुलनेत त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

-मुरलीधर मोहोळांच्या मागणीला फडणवीसांचा बूस्टर; पुण्यासाठी एका फटक्यात आणला २०० कोटींचा निधी

-बारामती बसस्टँडच्या उद्घाटनाचे आमंत्रण नाही; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बारामतीत तो प्रोटोकॉल…..”

-पुणे ड्रग्ज रॅकेट! कुरकुंभ ते दिल्ली अन् दिल्लीहून विमानाने १४० किलो मेफेड्रोन लंडनला रवाना

-ठाकरेंची शिवसेना आक्रमक; ‘बुधवार पेठ नाही तर कसबा पेठ मेट्रोस्टेशन हेच नावं हवं’

Tags: ajit pawarbjpdeepak mankarJagdish MulikKasbaMedha KulkarniMuralidhar MoholNarayan PethncpRajya SabhaSanjay KakadeShivaji MankarSunil Deodharअजित पवारकसबाजगदीश मुळीकदीपक मानकरनारायण पेठभाजपमुरलीधर मोहोळमेधा कुलकर्णीराज्यसभाराष्ट्रवादी काँग्रेसशिवाजी मानकरसंजय काकडेसुनील देवधर
Previous Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

भाजप इच्छुकांची धाकधूक वाढली; आज कृपाशंकर सिंह जाणून घेणार “मन की बात”

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
भाजप इच्छुकांची धाकधूक वाढली; आज कृपाशंकर सिंह जाणून घेणार “मन की बात”

भाजप इच्छुकांची धाकधूक वाढली; आज कृपाशंकर सिंह जाणून घेणार "मन की बात"

Recommended

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा; शनिवार, रविवार वेळ पाहूनच प्रवास करा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा; शनिवार, रविवार वेळ पाहूनच प्रवास करा

May 18, 2024
‘राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन अन्…’; बीडच्या गुन्हेगारीवरुन शरद पवारांच्या आमदाराचा गंभीर आरोप

‘राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन अन्…’; बीडच्या गुन्हेगारीवरुन शरद पवारांच्या आमदाराचा गंभीर आरोप

January 16, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved