Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मुरलीधर मोहोळांच्या मागणीला फडणवीसांचा बूस्टर; पुण्यासाठी एका फटक्यात आणला २०० कोटींचा निधी

by News Desk
February 28, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
मुरलीधर मोहोळांच्या मागणीला फडणवीसांचा बूस्टर; पुण्यासाठी एका फटक्यात आणला २०० कोटींचा निधी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शहरातील पूरस्थिती नियंत्रणासाठी नाले आणि सीमा भिंती उभारणे, या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी राज्य सरकारने तब्बल २०० कोटी रुपयांचा विशेष निधी पुणे महापालिकेस उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात विशेष निधी मिळावा, यासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर तातडीने निर्णय घेत हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय संदर्भातील शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पुणे शहरातील नाल्यांची कामे आणि सीमा भिंती बांधणे यासाठी महापालिकेचा निधी तांत्रिक अडचणींमुळे खर्च करता येत नव्हता. त्यामुळे सीमा भिंतींची कामे रखडली होती. नाला परिसरातील नागरिकांमध्ये पाऊस काळात चिंतेचे वातावरण होते. म्हणून या कामासाठी राज्य सरकारच्या विशेष निधीची आवश्यकता होती.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

हा निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर भाजप नेते आणि माजी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अडिच वर्षे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. ‘महाविकास आघाडी अडिच वर्षे सत्तेत असताना १ रुपयाही निधी उपलब्ध करुन दिला नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी याचा पाठपुरावा करत केवळ ८ दिवसात हा निधी उपलब्ध करुन दिला आहे’, असं हेमंत रासने म्हणाले आहेत.

मोहोळ यांनी फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन ‘महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या अंतर्गत २०० कोटी रुपये मंजूर करुन घेतले आहेत. उपलब्ध झालेल्या निधीमुळे शहरातील नाल्यांच्या कडेने संरक्षण/सीमा भिंती बांधल्या जाणार असून विशेषतः आंबील ओढा परिसराला याचा मोठा फायदा होणार आहे. या सीमा भिंतींमुळे पूरपरिस्थितीत पाणी प्रवाही राहण्यास मदत होणार आहे.

मोहोळ म्हणाले, ‘कमी वेळेत अधिक पाऊस झाल्याने २०१९ साली आंबिल ओढा परिसरात दुदैवी घटना घडली, त्यात वित्त आणि मनुष्यहानी झाली. असा प्रकार टाळण्यासाठी सीमा भिंतींची कामे महत्त्वाची ठरणार होती. त्यासाठी आपल्या पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध झाला, याचे नक्कीच समाधान आहे. मा. देवेंद्रजींचे पुणे शहराकडे विशेष लक्ष असल्याचे या निधीच्या मंजुरीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे’

‘हा निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद’, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-बारामती बसस्टँडच्या उद्घाटनाचे आमंत्रण नाही; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बारामतीत तो प्रोटोकॉल…..”

-पुणे ड्रग्ज रॅकेट! कुरकुंभ ते दिल्ली अन् दिल्लीहून विमानाने १४० किलो मेफेड्रोन लंडनला रवाना

-ठाकरेंची शिवसेना आक्रमक; ‘बुधवार पेठ नाही तर कसबा पेठ मेट्रोस्टेशन हेच नावं हवं’

-आढळराव पाटील नाही तर आता भाजपच्या ‘या’ नेत्याने अमोल कोल्हेंविरोधात दंड थोपटले

-राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मातोश्री मधुवंती पाटणकर यांचे निधन

Tags: Chief Minister Eknath ShindeDeputy Chief Minister Ajit Pawarhemant rasaneMinister Chandrakant PatilMuralidhar Moholउपमुख्यमंत्री अजित पवारमंत्री चंद्रकांत पाटीलमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुरलीधर मोहोळहेमंत रासने
Previous Post

बारामती बसस्टँडच्या उद्घाटनाचे आमंत्रण नाही; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बारामतीत तो प्रोटोकॉल…..”

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Recommended

भाजपचा भ्रष्टाचार उघड करणारी ‘फाइल’ उद्धव ठाकरेंकडे; पुण्यात ठाकरे सेनेची रणनीती

December 8, 2025
‘धंगेकर पुण्याचे वाल्मिक कराड’; काँग्रेस नेत्याची धंगेरकरांवर टीकेची झोड

March 11, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved