Thursday, July 9, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध असताना गेल्या तीन वर्षांत शहरातील पाणी साठणाऱ्या ठिकाणांची संख्या किती कमी केलीत, असा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. पुणेकरांना समस्या निर्माण होईल, असे एकही ठिकाण शहरात नको, अशा स्पष्ट शब्दांत मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. त्यावर १२० पाणी साठणाऱ्या ठिकाणांपैकी ८५ ठिकाणांची कामे करण्यात आल्याचा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला. त्यावर कामे झालेल्या ८५ ठिकाणांपैकी किती ठिकाणी पाणी साचले नाही, असा प्रतिप्रश्न मोहोळ यांनी केला.

शहरात मान्सूनचे उशीरा आगमन झाले असले तरी गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे समोर आले होते. यात पार्श्वभूमीवर दिल्लीहून परतताच मोहोळ यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत आपत्ती व्यवस्थापनाबाबत स्पष्ट सूचना दिल्या. बैठकीस महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बिडकर, विरोधी पक्ष नेते निलेश निकम, आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह गटनेते, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

You might also like

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

‘लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला लोकांना उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे पुढच्या काही वर्षांचा विचार करुन हे प्रश्न सोडवावे लागतील. शिवाय पावसाचा ट्रेंड बदलला असून गेल्या काही वर्षात कमी वेळेत अधिक पाऊस होत आहे. त्यादृष्टीने काय तयारी केली? याचीही विचारणा केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना केली. आवश्यक त्या सर्व यंत्रणा पुरवण्यास आम्ही तयार असून तुम्ही पुणेकरांना कोणतीही अडचण येणार नाही, असे काम करा, असेही मोहोळ म्हणाले.

सिंहगड रस्त्यावरील आपत्कालीन कक्ष सुरु करण्याचेही निर्देश अधिकाऱ्यांना दिले असून नदीपात्रात विशेष लक्ष देवून फ्लड सेंसरची संख्या वाढण्यासंदर्भातही सूचना दिल्या आहेत. शिवाय वॅार्ड ऑफिसर यांनी स्थानिक पातळीवर नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, याबाबतही सूचना दिल्या.

कामे केलेल्या किती ठिकाणी पाणी साचले नाही?

पुणे महापालिका हद्दीत एकूण १२० पाणी साठणारी ठिकाणे असून त्यापैकी ८५ ठिकाणांची कामे पूर्ण केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर ८५ पैकी किती ठिकाणी पाणी साठले नाही? असा सवाल मोहोळ यांनी केला. त्यावर अधिकाऱ्यांकडे कोणतीही ठोस माहिती नव्हती. त्यावर मोहोळ यांनी पुढच्या बैठकीत ८५ ठिकाणांचे पाऊस असतानाचे फोटो उपलब्ध करा, असे निर्देश दिले.

Tags: Murlidhar Mohol
Previous Post

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

News Desk

Related Posts

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
Please login to join discussion

Recommended

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
भ्रष्टाचारातही पुण्याचा झेंडा; देशात भ्रष्टाचारात महाराष्ट्र अव्वल अन् राज्यात पुणे

October 3, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved