Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

हडपसरमध्ये बाबरांचं बंडाचं निशाण; म्हणाले, “ज्यांना आपलं देणं घेणं नाही, त्यांचं मलाही…”

by News Desk
October 25, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Mahadev Babar and Uddhav Thackeray
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी काही जागा सोडल्या तर जवळपास सर्वच जागांवर उमेदवार जाहीर झाले आहेत. तर अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचाराला सुरवातही केली आहे. गुरुवारी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये पुण्यातील हडपसरमधून प्रशांत जगताप, आंबेगावमधून देवदत्त निकम, वडगाव शेरीमधून बापूसाहेब पठारे आणि बारामतीमधून युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्यात आली. त्यापैकी हडपसर मतदारसंघात आता आघाडीत नाराजी नाट्य पहायला मिळत आहे.

हडपसरच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा करण्यात आलेला होता. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार महादेव बाबर चांगलेच नाराज झाले आहेत. जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महादेव बाबर हे उद्धव ठाकरेंची भेटही घेतली. मात्र, भेटीवरही बाबर नाराज आहेत. आता ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. त्यांनी यापुढे पक्षाचे काम करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. ‘६ तास थांबलो फक्त ४० सेकंद आम्हाला दिले. उद्धव ठाकरेंनी पुणे जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार केली आहे. महाविकास आघाडीतून त्यांना एकही जागा पुणे जिल्ह्यासाठी मिळवता आलेली नाही. शिवसेना ही फक्त मुंबई पुरती मर्यादित राहिली आहे. आम्ही सगळे शिवसैनिक नाराज आहोत बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म देखील पुण्यात झाला. मात्र, आज एकही जागा आम्हाला पुण्यात मिळत नाही” असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

“केवळ मीच नाहीतर अख्खा पुणे जिल्हा नाराज आहे. शिवसैनिक नाराज आहेत. जिल्ह्यात अजुन एकही मशालचा उमेदवार दिला नाही, मग शिवसैनिकांनी काम कसं करायचं?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, आता मला कोणाचाही निरोप येऊ द्या मी आघाडीचं काम करणार नाही. ज्यांना आपलं देणं घेणं नाही. त्यांचं घेणं देणं असण्याचं काही कारणच नाही”, असे महादेव बाबर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-डोळ्यात अश्रू, मनातून खंत! काँग्रेसच्या बड्या महिला नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी, कसब्यातून उतरणार मैदानात

-युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर होताच काका अजित पवारांवर डागली तोफ; म्हणाले, ‘बारामतीचा भ्रष्टाचार’

-अजितदादांनी नाव घोषित केलं अन् सुनील टिंगरेंनी सोडला सुटकेचा निःश्वास; वडगाव शेरीत ‘राष्ट्रवादी पुन्हा’

-शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीत काका-पुतण्या भिडणार

-२०१९ ला संधी हुकली पण शरद पवारांनी यंदा दिली ताकद, प्रशांत जगताप हडपसरच्या मैदानात

Tags: HadapsarMaha Vikas AghadiMahadev BabarncpPrashant JagtapShiv Senaप्रशांत जगतापमहादेव बाबरमहाविकास आघाडीराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाहडपसर
Previous Post

डोळ्यात अश्रू, मनातून खंत! काँग्रेसच्या बड्या महिला नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी, कसब्यातून उतरणार मैदानात

Next Post

आमदार धंगेकरांनी लाटली मुस्लिम समाजाची १०० कोटींची जमीन, पत्नीच्या नावे केली प्रॉपर्टी; नेमकं खरं काय?

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
Ganesh Bidkar and Ravindra Dhangekar

आमदार धंगेकरांनी लाटली मुस्लिम समाजाची १०० कोटींची जमीन, पत्नीच्या नावे केली प्रॉपर्टी; नेमकं खरं काय?

Recommended

बावनकुळेंनी मोडला 35 वर्षांचा नियम, नागपुरातून थेट पुणे गाठलं अन् आबा बागुलांनी लक्ष्य साधलं!

बावनकुळेंनी मोडला 35 वर्षांचा नियम, नागपुरातून थेट पुणे गाठलं अन् आबा बागुलांनी लक्ष्य साधलं!

September 23, 2025
Murlidhar Mohol

शंकर जगतापांची राहुल कलाटेंवर टीका; ‘शरद पवारांचा कार्यकर्ता जरी असता तरी…’

October 28, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved