पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या प्रभाग रचना जाहीर केली. यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रभाग रचनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेप असल्याची चर्चा आहे. यामुळे या तिन्ही नेत्यांमध्ये नाराजी आणि राजकीय शीतयुद्ध निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
पुणे महानगरपालिकेने नुकतीच जाहीर केलेली प्रभाग रचनेची यादी राज्याच्या नगर विकास खात्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. महापालिकेने तीन प्रभाग-तीन सदस्य असा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, नगर विकास खात्याने हा प्रस्ताव बदलून चार सदस्यीय प्रभाग आणि एका प्रभागात पाच सदस्यांचा समावेश केला आहे. या बदलामुळे राजकीय पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.
महापालिकेचा तीन सदस्यीय प्रभागाचा प्रस्ताव हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने तयार झाला असण्याची शक्यता आहे. यामागे भाजप अनुकूल अशी रणनीती असू शकते. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असून, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे शहरात मोठा मतदारवर्ग आहे. त्यामुळे त्यांनीही या प्रस्तावात काही बदल सुचवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगर विकास खात्याचे मंत्री असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना पक्षाला अनुकूल असे बदल प्रस्तावात केले असण्याची शक्यता आहे. मूळ प्रस्तावात तीन सदस्यीय प्रभागाचा उल्लेख असताना नगर विकास खात्याने चार सदस्यीय प्रभाग निश्चित केले आहेत. यावर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार असून, त्यानंतर ही प्रभाग रचना अंतिम होईल.
या प्रक्रियेदरम्यान देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. यात अजित पवार यांचाही सहभाग असू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रभाग रचनेमुळे निर्माण झालेला हा तणाव निवडणुकीच्या रणनीतीवर कसा परिणाम करेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?
-कोथरुड पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या मुलींवर गुन्हा दाखल; प्रकरणाला वेगळं वळण
-भाजप आमदारासह राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला अटक करण्याचे आदेश, ३२ जणांविरोधात वॉरंट