Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘शिवतारेंचं शेपूट छाटण्याची वेळ आली, मुख्यमंत्र्यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी’; अजित पवार गटाची आक्रमक प्रतिक्रिया

"विजय शिवतारेंची काय लायकी"

by News Desk
March 23, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘शिवतारेंचं शेपूट छाटण्याची वेळ आली, मुख्यमंत्र्यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी’; अजित पवार गटाची आक्रमक प्रतिक्रिया
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय कट्टर विरोधक असणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप करत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवरुन आता अजित पवार गटानेही आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी विजय शिवतारे यांच्यावर टीका केली आहे.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगूनही माजी मंत्री विजय शिवतारे यांचे शेपूट सरळ झालेले नाही, त्यामुळे आता त्यांचे शेपूट छाटण्याची वेळ आली आहे. विजय शिवतारे यांचे व्यक्तिगत आयुष्य आणि इतर बाबी इतक्या खालच्या स्तराच्या आहेत. त्या चव्हाट्यावर आल्यामुळे शिवतारे यांचे व्यक्तिमत्त्व काय लायकीचे आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसमोर आले आहे. त्यामुळे त्यांना इतरांची लायकी तपासण्याचा अधिकार नाही”, असं म्हणत  उमेश पाटील यांनी शिवतारे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

दरम्यान, अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना समजावून सांगितले होते. ‘आपण महायुतीमध्ये असल्याने युतीचा धर्म पाळा’, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना केल्या होत्या मात्र तरीही विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर टीका करण्याचं सत्र सुरुच ठेवले. यावर उमेश पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगूनही शिवतारे यांचे शेपूट सरळ झालेले नाही, त्यामुळे त्यांचे शेपूट छाटण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची शिवसेनेतून तत्काळ हकालपट्टी करावी.”

महत्वाच्या बातम्या-

-लाल मातीतला पैलवान दिल्लीत पाठवायचाय! मोहोळांसाठी हजारो पैलवानांची फौज प्रचाराच्या मैदानात

-‘आगामी काळात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार’; सुप्रिया सुळेंची इंदापुरातली सभा तुफान गाजली

-आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘त्यांनी आत्पधर्म म्हणून..’

-मावळात महायुतीचा तिढा काही सुटेना; बारणेंना विरोध, भेगडेंनंतर आता जगताप यांच्या उमेदवारीची मागणी

-आढळराव पाटलांच ठरलं! 26 तारखेला होणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Tags: ajit pawarbjpChief Minister Eknath ShindeShiv SenaUmesh PatilVijay Shivtareअजित पवारउमेश पाटीलभाजपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविजय शिवतारेशिवसेना
Previous Post

लाल मातीतला पैलवान दिल्लीत पाठवायचाय! मोहोळांसाठी हजारो पैलवानांची फौज प्रचाराच्या मैदानात

Next Post

“आढळराव पाटलांना बदला घ्यायचाय, पण मी मायबाप जनतेकडे आशिर्वाद मागतोय”

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
Next Post
“आढळराव पाटलांना बदला घ्यायचाय, पण मी मायबाप जनतेकडे आशिर्वाद मागतोय”

"आढळराव पाटलांना बदला घ्यायचाय, पण मी मायबाप जनतेकडे आशिर्वाद मागतोय"

Recommended

“आमच्या काकांनी मला अडचणीत आणण्यासाठी गुंडांना…”; रोहित पवारांचा अजितदादांवर गंभीर आरोप

February 28, 2024
“महाराष्ट्र या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”- शरद पवार

February 11, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved