पुणे : संपूर्ण राज्यात वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन संतापाची लाट उसळली आहे. हगवणे कुटुंबाकडून झालेल्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आपले जीवन संपवले. जीव देण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी हगवणे कुटुंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता सुनेला त्रास देणं, हुंड्यासाठी तिचा छळ करणं या कारणांमुळे अटकेत असलेल्या हगवणे भावांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचं आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
हगवणे बंधूंनी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुणे पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी त्यांच्या पिस्तूल परवान्याची चौकशी केली असता, शशांक आणि सुशील यांनी खोटे पत्ते देऊन परवाने मिळवल्याचे उघड झाले. यामुळे शशांक याच्याविरोधात वारजे पोलिस ठाण्यात, तर सुशील याच्याविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हगवणे कुटुंबाचे अनेक कांड समोर आले त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.
हगवणे कुटुंब पुणे ग्रामीणमधील पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. त्यांनी 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता, परंतु तो फेटाळला गेला. त्यानंतर, शशांक आणि सुशील यांनी पुणे शहरात राहत असल्याचे खोटे पत्ते तयार केले. शशांकने वारजे, तर सुशीलने कोथरूड येथील खोटा पत्ता दाखवून पुणे शहर पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवला आणि पिस्तूल खरेदी केली.
या खोट्या माहितीच्या आधारे शस्त्र परवाना मिळवल्याचे उघड झाल्याने हगवणे बंधूंवर नव्याने गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या या गैरकृत्यामुळे हगवणे कुटुंबाच्या कायदेशीर अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. या प्रकरणामुळे त्यांच्या कृत्यांचा पर्दाफाश होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
-वैष्णवीच्या वडिलांची मागणी, सरकारने घेतला मोठा निर्णय; नेमकं काय घडलं?
-वैष्णवी हगवणे: गृहविभागाकडून मोठी कारवाई; थेट ‘त्या’ IPS अधिकाऱ्याचा पदभारच घेतला काढून
-वैष्णवी हगवणे प्रकरण: “हॅलो, निलेशला पकडलंय गाडीच्या डिक्कीत डांबलाय..” नेमकं प्रकरण काय?
-वैष्णवीचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचे जुने कांड उघड; “3 वर्षापूर्वीच एका वकिलाला…”