Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

वैष्णवी हगवणे: गृहविभागाकडून मोठी कारवाई; थेट ‘त्या’ IPS अधिकाऱ्याचा पदभारच घेतला काढून

by News Desk
May 29, 2025
in Pune, राजकारण
Vaishanvi Hagawane
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : संपूर्ण राज्याला हादरुन सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात शशांकच्या मामाची एन्ट्री झाली आहे. आतपर्यंत या प्रकरणी सासरे राजेंद्र, सासू लता, दीर सुशील, नणंद करिश्मा आणि पती शशांकला अटक करण्यात आली आहे. काल न्यायालयात झालेल्या युक्तीवादात आरोपी हगवणेच्या वकिलांनी केलेले सर्व आरोप वैष्णवीच्या वडिलांनी फेटळून लावले आहेत. त्यातच आता येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे नाव समोर आले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुपेकर यांच्या वादग्रस्त कारकीर्दीवर प्रकाश टाकत, त्यांच्याविरुद्ध ५०० कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी खटला सुरू असल्याचे पुराव्यासह उघड केले. तसेच, वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबीयांनी सुपेकर यांच्या नावाने धमकी देऊन कस्पटे कुटुंबीयांवर आणि पुणे पोलिसांवर दबाव टाकल्याचेही समोर आले आहे. यानंतर, सुपेकर यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

वैष्णवीच्या वडिलांनी आज पत्रकार परिषद घेऊन आरोपींच्या वकिलांकडून होणारे आरोप फेटाळून लावले. यावेळी त्यांनी सुपेकर हे वैष्णवीच्या मुलाचे मामा असल्याचे आणि मुलाच्या जन्मपत्रिकेत त्यांचे नाव मामा म्हणून नोंदवले असल्याचे स्पष्ट केले. यानंतर काही वेळातच सुपेकर यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आल्याचे समोर आले. ही कारवाई पोलिस वर्तुळात मोठी चर्चा बनली आहे.

जालिंदर सुपेकर हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असून, त्यांच्याकडे नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. कारागृह विभागात उपमहानिरीक्षक ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. या संवर्गात एकूण पाच पदे मंजूर असून, त्यापैकी दोन पदे भरलेली आणि तीन रिक्त आहेत. सुपेकर यांच्याकडे रिक्त असलेल्या तीन पदांचा अतिरिक्त कार्यभार होता, जो आता काढून घेण्यात आला आहे.

सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेतल्यानंतर, नागपूरची जबाबदारी उपमहानिरीक्षक स्वाती साठे, नाशिकची जबाबदारी अधीक्षक अरुणा मुगटराव आणि छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी अधीक्षक वैभव आगे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपांमुळे सुपेकर यांच्यावर झालेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे, आणि याबाबत पोलिस विभागात चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

-वैष्णवी हगवणे प्रकरण: “हॅलो, निलेशला पकडलंय गाडीच्या डिक्कीत डांबलाय..” नेमकं प्रकरण काय?

-हगवणे प्रकरण: ‘हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात…’; वकीलाच्या दाव्यावर अभिनेत्याची पोस्ट

-वैष्णवीचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचे जुने कांड उघड; “3 वर्षापूर्वीच एका वकिलाला…”

-आता भाजप आमदारही नाहीत सुरळीत? शिवीगाळ केली अन् घरात घुसण्याचा प्रयत्न, एकाला अटक

-ज्याची शंका होती तेच घडलं! कोर्टात हगवणेच्या वकिलाचा वेगळाच दावा, म्हणे “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीशी चॅटिंग…”

Tags: Jalindar SupekarpuneRajendra HagawaneVaishanavi Hagawaneजालिंदर सुपेकरपुणेराजेंद्र हगवणेवैष्णवी हगवणे
Previous Post

वैष्णवी हगवणे प्रकरण: “हॅलो, निलेशला पकडलंय गाडीच्या डिक्कीत डांबलाय..” नेमकं प्रकरण काय?

Next Post

वैष्णवीच्या वडिलांची मागणी, सरकारने घेतला मोठा निर्णय; नेमकं काय घडलं?

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
Vaishanavi Father

वैष्णवीच्या वडिलांची मागणी, सरकारने घेतला मोठा निर्णय; नेमकं काय घडलं?

Recommended

धक्कादायक! पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात ७५० ग्रॅम गांजा; काय आहे नेमका हा प्रकार?

धक्कादायक! पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात ७५० ग्रॅम गांजा; काय आहे नेमका हा प्रकार?

May 27, 2024
GBS Pune

मोठी स्वप्न घेऊन पुण्यात आली, पण बारामतीच्या तरुणीला ‘जीबीएस’नं गाठलं अन्…

February 19, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved