Sunday, June 15, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे पालिकेत ‘भाजप केंद्रित’ अंदाजपत्रक?; महाविकास आघाडीचा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा

by News Desk
February 18, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
विधानसभेनंतर लक्ष महापालिकेवर, ८ मतदारसंघात भाजपची सदस्य नोंदणी जोरात
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महापालिका वार्षिक अंदाजपत्रकामध्ये भाजपच्या काही मंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने विरोधकांमध्ये आता याचे तीव्र पडसाद उमटताना दिसू लागले आहेत. भाजप केंद्रीत अंदाजपत्रकाला महाविकास आघाडीने विरोध दर्शवला आहे. इतकंच नव्हे तर मविआने आता न्यायालयात जाण्याचा देखील इशारा दिला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केलेल्या एका वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) यांनी भाजपच्या या हस्तक्षेपाला विरोध दर्शविला आहे.

‘केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यामुळे मोठी ताकद हाती आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी आणि पदे येणार आहे. शहरासाठी मी आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्तांकडे बसून विधानसभा मतदारसंघनिहाय कोटा निश्चित केला आहे. त्यानुसार कामांच्या याद्या तयार करून दिल्या आहेत. या याद्यांचा समावेश महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात होईल, याची आम्ही दोघेही दररोज खात्री करत आहोत,’ असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केले होते. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

“भाजप केंद्रित अंदाजपत्रका विरोधात न्यायालयात दाद मागणार”

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही या हस्तक्षेपाला विरोध दर्शविला असून याबाबत बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, “यासंदर्भात महाविकास आघाडी म्हणून सर्व मित्रपक्ष आयुक्तांची भेट घेणार असून, त्यांना याबाबत निवेदन देणार आहोत. भाजप केंद्रित अंदाजपत्रक असेल तर, त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार. सत्ताधाऱ्यांच्या सूचनेनुसार कामे होत असतील तर, विरोधकांच्या पत्रांनुसारही कामे प्रस्तावित करावीत.”

“भाजपने प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे बंद करावं”

‘स्थायी समिती आणि आयुक्तांना अंदाजपत्रक करण्याचे अधिकार असतात. मात्र, सत्ताधारी मंत्र्यांचा हस्तक्षेप अंदाजपत्रकात झाला आहे. सत्ताधाऱ्यांचे ऐकून अंदाजपत्रक करणे हे कायद्याने योग्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून त्याला विरोध असून, भाजपने प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे बंद करावे,’ अशी भूमिका शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी मांडली.

“भ्रष्टाचार बाहेर येऊ नये, यासाठीच निवडणूक रखडविल्या जात आहेत”

‘गेल्या तीन वर्षांपासून हा हस्तक्षेप सुरू आहे. घरातील पैसा असल्यासारखे भाजप नेते हवे तसे वागत आहेत. भाजपच्या या हस्तक्षेपामुळे शहराचा असमोतल विकास झाला आहे. त्यामुळे आता मतदारांनीच जागे होऊन त्याबाबतचा जाब विचारावा. निवडणूक घेण्याची सत्ताधाऱ्यांची हिंमत नाही. भ्रष्टाचार बाहेर येऊ नये, यासाठीच निवडणूक रखडविल्या जात आहेत,’ असे म्हणत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी भाजपवर आगपाखड केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-प्रेमाचा गैरफायदा घेत त्याने शारीरिक, मानसिक त्रास दिला, फोनचा पासवर्ड देत तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

-Pune GBS: पुण्यात जीबीएस आजाराच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू; रुग्णसंख्या किती?

-शरद पवारांच्या ‘त्या’ आमदारानं घेतली अजित पवारांची भेट; नेमकं कारण काय?

-विधानसभेच्या पराभवाची धूळ झटकणार, राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी शरद पवार पुन्हा मैदानात

-‘आपल्याला पुणे जिंकायचंच’, बावनकुळेंचा नारा; पुण्यात भाजप ‘एकला चलो’?

Tags: Arvind ShindebjpBudgetChandrakant PatilncpPrashant JagtapPune Palika.Sanjay Moreअरविंद शिंदेअर्थसंकल्पचंद्रकांत पाटीलपुणे पालिकाप्रशांत जगतापभाजपराष्ट्रवादीसंजय मोरे
Previous Post

प्रेमाचा गैरफायदा घेत त्याने शारीरिक, मानसिक त्रास दिला, फोनचा पासवर्ड देत तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Next Post

तानाजी सावंतांना धक्का; फडणवीसांच्या एका आदेशात सरकारी सुरक्षा हटवली

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
Tanaji Sawant

तानाजी सावंतांना धक्का; फडणवीसांच्या एका आदेशात सरकारी सुरक्षा हटवली

Recommended

पिंपरीतील मोरवाडी परिसरात औद्योगिक कचऱ्याला आग; परिसरात भीतीचं वातावरण

पिंपरीतील मोरवाडी परिसरात औद्योगिक कचऱ्याला आग; परिसरात भीतीचं वातावरण

February 21, 2024
सुनेत्रा पवारांचे मोठे विधान! म्हणाल्या, “माझी उमेदवारी ही….”

सुनेत्रा पवारांचे मोठे विधान! म्हणाल्या, “माझी उमेदवारी ही….”

April 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved