Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘आम्ही अजितदादांसाठी सत्ता आणायची का? त्यांना महायुतीतून बाहेर काढा’; भाजप कार्यकर्त्यांची खदखद

by News Desk
June 27, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘आम्ही अजितदादांसाठी सत्ता आणायची का? त्यांना महायुतीतून बाहेर काढा’; भाजप कार्यकर्त्यांची खदखद
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. भाजपसह महायुतीच्या पराभवाला कारण ठरलेल्या अनेक गोष्टींपैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांना सोबत घेणं, ही देखील एक महत्त्वाची बाब असल्याचं बोलले जात आहे. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये याच मुद्यावरून सध्या संभ्रमावस्था दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेणं चूक असल्याची चर्चा सुरू असतानाच आता भाजप कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत थेट अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेली पिछेहाट पाहता भाजपने प्रमुख नेत्यांना निरीक्षक म्हणून 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये धाडले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीतून लढलेले राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार शिवाजीराव आढाराव पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर मध्ये भाजपची बैठक पार पडली. यावेळी राहुल कुल, माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह सर्वप्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष असणारे सुदर्शन चौधरी यांनी “कार्यकर्त्यांचे मन काय सांगतेय हे ऐकून जर निर्णय घेणार असाल, तर अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा. त्यांनी आजवर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे” अशी भावना व्यक्त केली.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

नेमकं काय म्हणाले सुदर्शन चौधरी?

“कार्यकर्त्यांचे मन काय सांगतेय हे ऐकून जर निर्णय घेणार असाल, तर अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा. त्यांनी आजवर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. आमच्या अनेक लोकांना महामंडळ तसेच मंत्री पद मिळाले असते, विधानसभेला अजित पवार जर आमच्यासोबत राहणार असतील तर अशी सत्ताच भाजप कार्यकर्त्यांना नको. स्वाभिमानी नेतृत्व पुणे जिल्ह्याला मिळत नसल्याने लोकांचे हाल झालेले आहेत. गेली दहा-दहा वर्ष आम्ही त्यांच्याशी दोन हात करत आहोत, मात्र आता त्यांच्यासोबतच हात मिळवणी कशासाठी करण्यात आली हे समजत नाही. आम्ही काय अजितदादांसाठी सत्ता आणायची का? पालकमंत्री होऊन त्यांनी बॉस व्हायचं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम करायची, असे होणार असेल तर ही सत्ता आम्हाला नको.”

महत्वाच्या बातम्या-

-पुणेकरांना मोठा दिलासा! केंद्रीय मंत्री मोहोळांच्या प्रयत्नांनंतर अखेर एअर इंडियाचे ‘ते’ विमाना हटवले

-पुणेकरांनो सावधान! डासांपासून सावध रहा; शहरात सापडला झिकाचा तिसरा रुग्ण

-फडणवीस-ठाकरे एकाच लिफ्टमध्ये; ‘तुमचं अजून समाधान झालं नाही का’ म्हणत दरेकरांनी सांगितला लिफ्टमधला किस्सा

-महाराष्ट्रातील ‘या’ 8 आमदारांनी दिले राजीनामे; वाचा नावे

-‘महायुतीत खडकवासल्याची जागा शिवसेनेला हवी’, शिंदेंच्या शिलेदाराने थोपटले दंड; नेमकं गणित काय?

Tags: ajit pawarbjpmahayutipuneRahul KulSudarshan Chaudhariअजित पवारपुणेभाजपमहायुतीराहुल कुलसुदर्शन चौधरी
Previous Post

पुणेकरांना मोठा दिलासा! केंद्रीय मंत्री मोहोळांच्या प्रयत्नांनंतर अखेर एअर इंडियाचे ‘ते’ विमान हटवले

Next Post

‘तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो’; अंधारे- देसाईंचा वाद काही थांबेना

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
‘तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो’; अंधारे- देसाईंचा वाद काही थांबेना

'तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो'; अंधारे- देसाईंचा वाद काही थांबेना

Recommended

Ajit Pawar

मोदींचा दौरा रद्द, पण अजितदादांनी पहाटेच केली मेट्रोच्या कामाची पाहणी

September 26, 2024
भाजपचं ठरलंय! पुण्यात मुरलीधर मोहोळ लोकसभेचे उमेदवार?

“विकासकामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार, मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई”- मुरलीधर मोहोळ

March 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved