पुणे : पुणे शहरातील रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे. रेल्वे स्टेशला बाजीराव पेशवा नाव देण्यास शरद पवार गटाने विरोध केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विरोध केला आहे. यावरुन आता परशूराम हिंदू सेवा संघकडून शहरात शरद पवारांना सवाल करण्यात आला आहे.
‘रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशवा नाव देण्यास शरद पवार गटाचा विरोध का? त्याच उत्तर द्या, अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा अपमान पुणेकर सहन करणार नाहीत, अशा आशयाचे पोस्टर्स शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत.
दरम्यान, पुणे स्टेशनचं नाव बदलण्यात येऊ नये. बदलायचंच असेल तर महात्म फुले किंवा गोपाळकृष्ण गोखले यांचं नाव देण्यात यावं, असं अंकुश काकडे म्हणाले होते. त्यानंतर शहरात पोस्टरबाजी केल्याचे पहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या
-माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर, अजित पवारांचा दणदणीत विजय
-पुण्यातील ‘त्या’ बंद भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी; वकिलांची पालिकेकडे पुन्हा सुरू करण्याची मागणी
-लांडगे पैलवान असले तरी त्यांचे वस्ताद अजितदादाच आहेत; राष्ट्रवादीचा सणसणीत टोला
-शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ प्रकल्पाला नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद