पुणे : बिबवेवाडी येथील सर्वे क्रमांक ५७९/१ब येथे अनधिकृतपणे डोंगरफोड करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांविरुद्ध पुणे प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. या ठिकाणी बेकायदा उत्खनन आणि जागेचे सपाटीकरण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली. यापुढे पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या अशा अनधिकृत कृत्यांविरुद्ध कडक पावले उचलली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.
प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार, मौजे बिबवेवाडी येथे अनधिकृतपणे डोंगरफोड करून जागेचे सपाटीकरण सुरू होते. याची पडताळणी करण्यासाठी प्रशासनाने ड्रोनद्वारे स्थळाची पाहणी केली आणि पंचनामा केला. पाहणीदरम्यान, अनधिकृत उत्खनन आणि डोंगरफोड होत असल्याचे आढळून आले. प्रशासनाने तात्काळ ही कामे थांबवली आणि यासाठी वापरलेले पोकलँड हुंडाई टू टेन जप्त केले.
या मिळकतीचे मालक राकेश शर्मा असून, त्यांनी आणि संबंधित विकसकांनी उत्खनन तसेच जागा सपाटीकरणासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती, असे कारवाईदरम्यान निदर्शनास आले. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षणासाठी प्रशासनाने घेतलेल्या या कारवाईमुळे अशा बेकायदा कृत्यांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
-राहुल गांधी यांचा जामीन रद्द करा; सात्यकी सावरकरांच्या वकिलांची मागणी
-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय; राज्यात बड्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल
-भारत-पाक युद्ध झालं तर पुणे टार्गेटवर; नेमकं काय कारण?
-भारत-पाकिस्तान युद्ध: पुण्यावर काय परिणाम? शहराबाहेर जाण्याचा प्लान करण्याआधी हे वाचाच…