पुणे : गेल्या २ दिवसांपूर्वीच बाणेर परिसरातील २ मसाज पार्लवर पोलिसांनी कारवाई केली होती. अशातच आता कल्याणीनगर परिसरातील ‘निद्रा बॉडी स्पा’ या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. येरवडा पोलिसांनी छापा टाकत कारवाई पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेतले. तर व्यवस्थापक हर्षवर्धनसिंग भारत मोडासिया (वय २२, रा. कोरेगाव पार्क) आणि आसाफुल इस्लाम मुजिबुर रहिमान (वय २३, मूळ रा. आसाम) यांना अटक केली आहे. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पार्लरचा मुख्य चालक जुनैद फारूख शेख फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. पोलीस कर्मचारी मयूरी नलावडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पिटा) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ठाकर तपास करत आहेत. मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
या घटनेमुळे कल्याणीनगर परिसरात खळबळ उडाली असून, मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कारवाई तीव्र केल्याचे दिसते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, फरार पार्लरचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.
महत्वाच्या बातम्या
-पुणे आयडॉल स्पर्धा: ‘गायकांनी कालानुरूप बदल स्वीकारले पाहिजेत’; पं. अजय पोहनकरांचं आवाहन
-एरव्ही पिक्चरमध्ये बोल्ड सीन आला की बंदी घालणाऱ्या चाकणकर…; शालिनी ठाकरें आक्रमक, नेमकं काय प्रकरण?
-पीएमपी प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; उशिरा तिकीट काढाल तर होणार कारवाई
-Pune: हवाई दलाच्या जवानाच्या वेशात केली फसवणूक; पुणे पोलिसांनी आवळल्या मुस्क्या