पुणे : महाराष्ट्रात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत झटणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी ‘सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे पुरस्कार’ यंदापासून सुरू होत आहे. मालुसरे घराण्याच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येणार असून, सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यपूर्ण आणि पवित्र स्मृतींना अभिवादन करण्याचा हा संकल्प आहे, अशी माहिती मालुसरे घराण्याचे वंशज बाळासाहेब मालुसरे यांनी दिली आहे.
यंदापासून या पुरस्काराची सुरुवात होणार असून यामध्ये एक लाख रुपये रोख, चांदीचे कडं, मानपत्र, स्मृतिचिन्ह, मालुसरे पगडी, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन विजेत्यांचा सन्मान केला जाईल. पुरस्कारासाठी पात्र व्यक्तींची निवड करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांचे एक पॅनल स्थापन करण्यात आले आहे, जे संपूर्ण महाराष्ट्रातून योग्य व्यक्तींची निवड करेल. मालुसरे घराण्याचा विस्तार आज राज्यातील ९८ गावांपर्यंत झाला असून, या उपक्रमासाठी सर्व सदस्यांचे सहकार्य मिळणार आहे.
सुभेदार तान्हाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी होते. सिंहगडच्या लढाईत त्यांनी दाखवलेले शौर्य, बलिदान आणि स्वराज्यनिष्ठा आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे हे पराक्रम आणि विचार समाजात कायम राहावेत, यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. समाजातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्यांचा सन्मान करून त्यांचे योगदान अधिक व्यापक व्हावे, हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे, असे बाळासाहेब मालुसरे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पुण्यात कोण करणार नेतृत्व? ‘या‘ नावाची चर्चा, पण दादांची पसंती कोणाला?
-Local body Election: इच्छुकांची धाकधूक वाढवणारी बातमी, निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला महत्वाचे आदेश
-आधी सफरचंद आता ड्राय फ्रुट्स: तुर्कीच्या जर्दाळू आणि हेजलनट आयातीवर बहिष्कार