पुणे : इंद्रायणी नदीच्या नदीपात्रालगत चिखली परिसरात ब्ल्यू लाईनमध्ये बांधण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर अखेर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. ब्ल्यू लाईनमध्ये कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नसताना हे बंगले उभारले गेले होते, याबाबत महानगरपालिकेने सुरुवातीला निष्क्रिय भूमिका घेतल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती, परंतु त्यांची याचिका फेटाळली गेली त्यामुळे हरित लवादाच्या कारवाईचा निर्णय कायम आहे. मात्र आता बंगला धारकांनी पालिकेकडून आमची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.
३१ मे २०२५ पूर्वी हे बंगले पाडण्याचे आदेश महानगरपालिकेला देण्यात आले होते. त्यानुसार, शनिवार, १७ मे २०२५ रोजी सकाळपासून महानगरपालिकेने कारवाईला सुरुवात केली. या कारवाईदरम्यान बंगल्यांच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेत. तसेच महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित आहेत.
“आमची फसवणूक झाली आहे. आम्हाला बिल्डर ने आर झोन दाखवला. आम्ही रीतसर ही जागा विकत घेतली होती. पहिलं बांधकाम झालं, तेव्हाच महानगरपालिकेने आमच्यावर कारवाई करायला हवी होती. उलट महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडून पैसे घेतले. शासनाने आम्हाला लाईट, पाणी, गॅस लाईन दिलेली आहे, असे बंगला धारक महेंद्र मधुकर विसपुते यांचे म्हणणे आहे.
“जुलै २०२४ मध्ये इंद्रायणी नदीच्या निळ्या पुरेशेतील ३६ बंगल्यांबाबत सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. याबाबत बांग्लाधारक हे एनजीटीच्या विरोधात सर्वोच्च न्यायलयात गेले होते. परंतु, त्यांची याचिका फेटाळून लावली. अखेर हरित लवादाने जो निर्णय दिला आहे. तो अंतिम राहिल आणि पावसाळ्यापूर्वी आम्ही ते बंगले पाडत आहोत. नागरिकांना आवाहन आहे. निळ्या पुररेषेत बांधकाम करू नये. घर घेण्याआधी ते अधिकृत आहे की? अनधिकृत आहे. याबाबत नागरिकांनी सजग राहावे” असे आवाहन महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यामुळे ब्ल्यू लाईनमधील बांधकामांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे, परंतु सुरुवातीला अशा बांधकामांना परवानगी कशी मिळाली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यातील ‘त्या’ बहुचर्चित रस्त्याला स्थगिती; नेमकं कारण काय?
-प्रेयसीने दिला लग्नाला नकार, त्याने थेट इनटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर टाकला
-नालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा; मुरलीधर मोहोळांचे आदेश
-भाजप खासदार मेधा कुलकर्णींना स्वपक्षीय नेत्याची धमकी, म्हणाले “आधी तिकीट कापलं आता…”