पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे वय 23 भुकूम येथे गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेने संपूर्ण पुणे शहरासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या घरात महिलांवर अत्याचार होत असल्याचे उघड झालं. अशातच विरोधकांकडून अजित पवार तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका करण्यात आली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
अजित पवारांचा कारची चावी देतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच प्रमाणावर वायरल झाला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी होत असल्याचे देखील बोलल जात होते. अखेर यावर पाऊल उचलत पक्षाने राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. अद्याप राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा हे फरार असून त्यांचा शोध पिंपरी- चिंचवड पोलीस घेत आहेत.
राजेंद्र हगवणे यांच्याकडून देण्यात आलेल्या सर्व जबाबदाऱ्या काढून घेण्यात आले आहेत. हगवणे यांच्या कुटुंबातून वैष्णवीचे पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील हगवणे आणि नणंद कारिश्मा हगवणे यांनी वैष्णवीला बेदम मारहाण केली. तिचा शारीरिक, मानसिक छळ केला. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या अंगावर मारहाणीचा व्रण दिसले यावरून पोलीस तपासाला सुरवात झाली आणि हगवणे कुटुंबाचं घृणास्पद कृत्य जगासमोर आलं. वैष्णवी ही हगवणे कुटुंबाची लहान सून होती. शशांक आणि वैष्णवीचा प्रेमविवाह झाला होता. तसेच वैष्णवीच्या वडिलांनी या दोघांनाच धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला होता.
हगवणे कुटुंबाला हुंडा म्हणून 51 तोळे सोने, 7. 5 किलो चांदीची भांडी, दुचाकू स्कुटी, चारचाकी आलिशान फॉर्च्यनर दिली होती. मात्र लग्नात एवढ सगळं देऊनही हगवणे कुटुंबाकडून वैष्णवीला 2 कोटीच्या संपत्तीसाठी छळ करण्यात आला. मारहाण आणि त्यांनतर तिचा मृत्यू झाला. हगवणेंची थोरली सून देखील त्यांच्या याच त्रासाला कंटाळून तिच्या माहेरी गेलेली आहे.
महत्वाच्या बातम्या
-चिमुकली टीव्ही बघायला गेली अन् नराधम शेजाऱ्याने संधी साधली, शेजारधर्माला काळिमा फासणारी घटना
-राज्याला अवकाळी पावसाचा फटका; मुख्यमंत्र्यांनी शेकऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
-‘तीच माझ्या आयुष्यातील मोठी चूक’; वैष्णवीने मैत्रिणीला नेमकं काय सांगितलं? ऑडिओ क्लीप व्हायरल
-‘ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिलेय?’ ‘ती’ कार पाहून अजित पवारांनी विचारला होता खोचक प्रश्न
-पाकिस्तानचा नारा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल, कॉलेजने काढून टाकलेली तरुणी म्हणते…