पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरून सोडले असून या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत असल्याचं समोर येत आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात बावधन पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आता या प्रकरणी वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी हा खटला हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. वैष्णवीने आत्महत्या करण्यासाठी वापरलेली साडी आणि घरातील पंखा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. या फॉरेन्सिक अहवालातून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
वैष्णवी हगवणे हिने १६ मे २०२५ रोजी भुकूम येथील आपल्या घरी सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतला होता. या प्रकरणी १७ मे रोजी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, दीर सुशील, नणंद करिष्मा आणि सहआरोपी नीलेश चव्हाण यांना अटक केली आहे. सध्या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी सासरकडून होणारा त्रास आणि मारहाणीमुळे तिने आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी हा खटला हत्या असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. पोलिसांनी तपासाला वेग देत वैष्णवीने वापरलेली साडी आणि पंखा फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. वैष्णवीचे वजन ७१ किलो असल्याचे पंचनाम्यात नोंदवले गेले आहे. त्यामुळे हा पंखा इतके वजन सहन करू शकतो का? याची तपासणी होणार आहे.
सहआरोपी निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये कोणते व्हिडीओ?
निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये काही व्हिडीओ क्लिप असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी तो जप्त केला. मात्र, तो माझा नाहीच, असे निलेशने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी हा लॅपटॉप न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवला आहे. अहवाल आल्यानंतर लॅपटॉमध्ये काय आहे याचा उलगडा होणार आहे. मात्र, निलेशने हा लॅपटॉप आपला नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी लॅपटॉप जप्त करून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर लॅपटॉपमधील सामग्रीचा खुलासा होईल, ज्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर येण्यास मदत होऊ शकते. पोलिस सर्व दृष्टिकोनातून तपास करत असून, लवकरच या प्रकरणातील महत्त्वाचे निष्कर्ष समोर येतील, अशी अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
-नीलम गोऱ्हेंनी बोललवी महत्वाची बैठक; महिला आयोगाच्या कारभाराची घेणार झाडाझडती
-बाप तालुक्याचा उपाध्यक्ष, बायको सरपंच, राष्ट्रवादीचा पदाधिकारीच निघाला अट्टल सायबर चोर
-वैष्णवीच्या वडिलांना २ कोटी मागायला लावणारा ‘तो’ बांधकाम व्यावसायिक कोण?