पुणे : भारतातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ तर्फे ‘वासंतिक चंदन उटी’ महोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी ‘भारतीय वारकरी मंडळा’ने सादर केलेल्या भजन सेवेने श्रद्धाळूंना भक्तीरसात न्हाऊ घातले. संकष्टी चतुर्थीच्या पवित्र दिवशी शुक्रवारी १६ मे २०२५ रोजी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवात उन्हापासून संरक्षणासाठी श्री गणेशमूर्तीवर चंदनाचा लेप लावण्यात आला आहे.
श्रद्धाळूंनी चंदन, गुलाबजल, अत्तर, केसर आणि गंधाचे मिश्रण अभिषेकासाठी अर्पण केले आहे. मंदिर परिसर मोगरा आणि विविध फुलांनी सजवण्यात आला होता. ‘भारतीय वारकरी मंडळा’च्या भजनसेवेतील मधुर स्वर, तसेच टाळ-मृदंगाच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. ट्रस्ट वर्षभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते.
या महोत्सवात ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि सेवक सक्रियपणे सहभागी झाले होते. या उत्सवाने श्रद्धाळूंना आध्यात्मिक अनुभवाचा आनंद दिला, तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या परंपरेची भव्यता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. भक्ती आणि श्रद्धेचा हा संगम पाहण्यासाठी पुणे आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
-इंद्रायणी नदीपात्रातील ‘त्या’ ३६ बंगल्यांवर पालिकेने चालवला बुलडोझर; कोट्यावधींचे बंगले जमीनदोस्त
-पुण्यातील ‘त्या’ बहुचर्चित रस्त्याला स्थगिती; नेमकं कारण काय?
-प्रेयसीने दिला लग्नाला नकार, त्याने थेट इनटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर टाकला
-नालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा; मुरलीधर मोहोळांचे आदेश