पुणे : भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव वाढला असून, सर्व देशांचे लक्ष आता पुढील घडामोडींकडे लागले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ते १७ मे दरम्यान नॉर्वे, नेदरलँड आणि क्रोएशियाचा नियोजित दौरा भारत-पाकिस्तान तणावामुळे रद्द केला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने अमेरिका, चीनसह प्रमुख देशांशी राजनैतिक संपर्क तीव्र केला आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी अनेक देशांच्या समकक्ष अधिकाऱ्यांशी आणि राजदूतांशी चर्चा केली आहे. पुढील २४ ते ४८ तासांत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची पुढील कृती महत्त्वाची ठरणार आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत भागातील हल्ल्यांकडे रावळपिंडीचा दृष्टिकोन पुढील निर्णय ठरवेल.
मुरीदके येथे लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय, बहावलपूर येथे जैश-ए-मोहम्मदचा तळ आणि सियालकोट येथे हिजबुल मुजाहिदीनचा अड्डा आहे. या तिन्ही दहशतवादी तळांवरील हल्ले पाकिस्तानच्या रणनीतीला अपमानास्पद मानले जात आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या सशस्त्र दलांकडून प्रत्युत्तराची शक्यता वाढली आहे.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरच्या कार्यपद्धतीबाबत बोलताना सांगितले की, ‘तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र, पाकिस्तानने तणाव वाढवण्याचा निर्णय घेतल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहे’, अशी माहिती त्यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
-तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का?; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
-“आमच्या भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ने घेतला”- हेमंत रासने