पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्याला हादरुन सोडणारी घटना घडली. बावधन पोलिसांनी आज पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी मुसक्या आवळल्या. वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबाबद्दल खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत. आता या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. वैष्णवीच्या आई-वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर आता निलेश चव्हाण याच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. पण हा निलेश चव्हाण कोण? याचा वैष्णवी हगवणे प्रकरणाशी काय संबंध?
वैष्णवी हगवणे हिची नणंद करिष्मा हगवणे….वैष्णवी-शशांकच्या लग्नानंतर करिष्माने देखील वैष्णवीला त्रास देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. एवढंच नाही तर हगवणेंच्या कुटुंबाशी निलेश चव्हाणची खूप जास्त जवळीक होती. कारण वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं १० महिन्यांचं बाळ हे निलेशकडेच होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वैष्णवीच्या बाळाला कस्पटे कुटुंबियांच्या स्वाधीन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे आणि वैशाली नागवडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. कस्पटे कुटुंब हे बाळाचा ताबा घेण्यासाठी हगवणे यांच्या घरी गेले असता याच निलेश चव्हाणने कस्पटे कुटुंबाला पिस्तुलाचा धाक दाखवला. या पिस्तुलाच्या भीतीने कस्पटे कुटुंबाला बाळाचा ताबा घेता आला नव्हता. याच प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्याला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन देखील मंजूर केला आहे.
निलेशने स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याचंही आता उघड झाले आहे, ज्यामुळे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी चर्चेत आली आहे. निलेश चव्हाणच्या कृत्यांची नोंद वारजे पोलिस ठाण्यात आहे. २०१८ मध्ये निलेशचे लग्न झाले, पण २०१९ मध्ये त्याने बेडरूममधील सिलिंग फॅनला स्पाय कॅमेरा लावून पत्नीचे खासगी क्षण रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. निलेशच्या पत्नीला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती.
त्याच्या पत्नीला त्याच्या लॅपटॉपमध्ये त्याच दोघांचे (शरीरसंबंध ठेवतानाचे) व्हिडीओ सापडले आढळले. ज्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. निलेश हा पेशाने बांधकाम व्यावसायिक असून, हगवणे कुटुंबाशी त्याचे कौटुंबिक संबंध होते. वैष्णवी आणि शशांक यांच्या वादांमध्येही तो सहभागी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
हगवणे कुटुंबाशी निलेशचे संबंध
मयुरी हगवणे यांच्या आरोपांनुसार, निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाच्या वादांमध्ये सक्रियपणे सहभागी होता. वैष्णवीच्या लग्नापूर्वीच्या बैठका त्याच्या ऑफिसमध्ये झाल्या होत्या. करिष्मा हगवणेचा मित्र म्हणून तो ओळखला जातो. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाळ निलेशकडे सोपवण्यात आले होते, यावेळी त्याने कस्पटे कुटुंबाला धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणाने सामाजिक आणि राजकीय स्तरावर मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करत तपास तीव्र केला आहे. याच बरोबर हगवणेंची मोठी सून मयुरी हगवणे हिने देखील निलेश चव्हाणचा उल्लेख करत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुणे पुन्हा हादरलं; हगवणे प्रकरण ताजं असतानाच २२ वर्षीय तरुणीचा हुंडाबळी
-अन् वैष्णवीचं बाळ आजी-आजोबांकडं पोहचलं…अजितदादांच्या दोन महिला नेत्यांनी केली मोहीम फत्ते