पुणे : पुणे शहरासह राज्याला हादरुन सोडलेल्या स्वारगेट अत्याचार प्रकणातील आरोपी दत्ता गाडे हा सध्या अटकेत आहे. दत्ता गाडे याला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरु असून या प्रकरणात नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. आरोपी दत्ता गाडे (वय ३७, रा, गुनाट, शिरुर) याने तरुणीवर २ वेळा लैंगिक अत्याचार केला. फेब्रुवारीच्या २५ तारखेला पहाटे स्वारगेट बसस्थानकामधील शिवशाही बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.
या प्रकरणी ८९३ पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आरोपीने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाला पोलिसांनी विरोध केला असून, त्याची कारणमीमांसा करणारा अर्ज शुक्रवारी न्यायालयात सादर केला आहे. दत्ता गाडेची चौकशी करताना त्याच्या मोबाईची गुगल सर्च हिस्ट्री सायबर तज्ञांच्या मार्फत तपासणी करण्यात आली. त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आधी त्याच्या मोबाईलमधून त्याने गेल्या वर्षभरात तब्बल २२ हजार वेळा अश्लील व्हिडिओ पाहिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
आरोपी दत्ता गाडेची मानसिकता अतिशय खालच्या पातळीवर पोहचली असल्याचं त्याच्या मोबाईलवरुन उघड होत आहे. त्याची महिलांकडे पाहण्याची नजर देखील अतिशय वाईट होती. आधी काही महिलांनी त्याच्यावर रस्त्यामध्ये अडवून गोड बोलून गाडीत बसवून आड मार्गी नेत अत्याचार करण्याच्या तक्रारी केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
-सिंहगड रोडवरील उड्डाणपुलामुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
-लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी जमा होणार? अदिती तटकरेंनी सांगितली तारीख
-पंकजा मुंडेंना अश्लिल मेसेज, कॉल करणं तरुणाला पडलं महागात
-मस्जिदीत बाहेरच्या मुस्लिमांना नो एन्ट्री; पुण्यातील ‘त्या’ आवाहनाची चर्चा
-उन्हाच्या कडाक्याने पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही; तापमानाचा पारा पुन्हा चाळीशी पार