पुणे : १३५ वर्षांच्या ऐतिहासिक वारशाची असलेली महात्मा फुले मंडई ही पुण्याचा मानबिंदू आहे. या मंडईतील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विद्युत दिवे आणि स्वच्छतेच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही प्रभाग २५ चे नवनिर्वाचित नगरसेवक राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी दिली आहे. मंडईतील व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित आढावा दौऱ्यात ते बोलत होते.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, मंडईतील जुने झालेले विद्युत दिवे आणि अपुरी प्रकाशव्यवस्था यामुळे व्यापारी तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. स्वच्छतेच्या समस्याही गंभीर आहेत. यावर बाप्पू मानकर म्हणाले, “व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रकाशव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तातडीने हे दिवे बदलण्याचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण केले जाईल.”
स्वच्छतेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, मंडईच्या स्वच्छतेसाठी प्रशासनासोबत यंत्रणा कार्यरत करून कचरा साठणार नाही याची काळजी घेतली जाईल. व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवणे हे प्राधान्याचे काम असून, मंडईचा ऐतिहासिक वारसा जपत विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आढावा दौऱ्यात व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या आणि बाप्पू मानकर यांनी प्रत्येक मुद्द्यावर तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले.
मंडईतील व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी ठोस पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या भेटीने मंडईतील व्यापाऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. ऐतिहासिक महात्मा फुले मंडईचा विकास आणि त्यातील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बाप्पू मानकर यांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का; माजी आमदारांच्या कुटुंबियांचा भाजपमध्ये प्रवेश
-महापालिकेतील विजयानंतर गणेश बिडकर ॲक्शन मोडमध्ये, विकास कामांची यादी घेत महापालिका आयुक्तांची भेट
-आई महापालिकेत सफाई कामगार, त्याच पालिकेत लेक नगरसेवक म्हणून जाणार! पुण्यातील लढाई ठरली चर्चेची














