पुणे : बदलत्या काळानुसार महाराष्ट्रामध्येही प्रेमविवाहाचे प्रमाण वाढले आहे. प्रेमविवाहात विश्वासघात झाल्याची अनेक प्रकरणे समोर आले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने सुनेचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच यवतमाळमधून आणखी एक धक्कादायक हत्याकांड समोर आली आहे. मुख्याध्यापिका निधी शंतनू देशमुख हिने आपला पती आणि शिक्षक असलेल्या शंतनू अरविंद देशमुख (वय ३२) याला विष देऊन ठार मारल्याचे समोर आले आहे.
निधीने पती शंतनूचा मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी शिकवणीला येणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेह जाळला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दोघेही एकाच शाळेत शिक्षक होते आणि त्यांचा प्रेमविवाह गेल्या वर्षी झाला होता. शंतनू आणि निधी यांचा प्रेमविवाह असल्याने तो आई-वडिलांपासून विभक्त राहत होता.
जंगलात मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच शंतनूसोबत दारू पिण्यासाठी बारमध्ये असणाऱ्या मित्रांमध्ये चर्चा सुरू झाली. पोलिसांनी या प्रकरणी मित्रांची चौकशी सुरू केली. त्यावेळी एकाच्या मोबाइलमध्ये शंतनूचा १३ मे रोजीचा फोटो दिसला त्या दिवसानंतर तो गायब झाला होता. त्याच्या अंगातील शर्ट आणि मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा हे दोन्ही सारखेच होते. त्यावरुन पोलिसांनी तपासाला सुरवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निधी आणि शंतनू यांच्यात सतत भांडणे होत होती. शंतनूच्या मद्यपानाच्या सवयीमुळे त्यांचे नाते बिघडले होते. या भांडणातून वैतागून निधीने शंतनूला संपवण्याचा कट रचला. १३-१४ मे २०२५ च्या मध्यरात्री तिने शंतनूला बनाना शेकमध्ये विष मिसळून दिले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना सोबत घेतले आणि यवतमाळ शहरालगतच्या चौसाळा जंगलात टेकडीवर मृतदेह टाकून पेटवून दिला. १५ मे रोजी हा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. मृतदेहाजवळ आढळलेले अंडरवीयर आणि शर्टचे बटण यांच्या आधारे शंतनूची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी निधीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी निधीसह पोलिसांनी अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. निधीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु आहे. या घटनेने यवतमाळ जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. शिक्षक-विद्यार्थी नात्याचा असा गैरवापर आणि एका मुख्याध्यापिकेने स्वतःच्या पतीच्या हत्येसाठी विद्यार्थ्यांचा वापर करणे, यामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिकांनी पोलिसांना कठोर कारवाईची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-पाकिस्तानचा नारा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल, कॉलेजने काढून टाकलेली तरुणी म्हणते…
-महिन्यात एक नाही दोन नाही तर तब्बल २५ पुरुषांशी केलं लग्न, अखेर ‘त्या’ रात्री पितळ उघड पडलंच
-काँग्रेसमधून आलेल्या धंगेकरांची शिवसेनेत बढती; एकनाथ शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी
-भुजबळ मंत्रिमंडळात! भाजपचा राजकीय डाव की अजितदादांचा नाईलाज?