Saturday, June 7, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

वैष्णवी हगवणे: ‘आरोपीच्या वकिलाचे वर्तन कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन’; महिला आयोगाचं बार कौन्सिलला पत्र

by News Desk
May 30, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
वैष्णवीचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचे जुने कांड उघड; “3 वर्षापूर्वीच एका वकिलाला…”
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर राजेंद्र हगवणे आणि सुशील यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी युक्तीवादात बोलताना हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीच्या व्हॉट्सअॅप चॅटचा आधार घेत तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले. यानंतर, आरोपींचे वकील विपुल दुशिंग यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला. त्यांनी, “एखाद्या नवऱ्याने पत्नीला चार कानशिलाट मारल्या म्हणजे तो छळ होत नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यावरून राज्यभरात संताप व्यक्त होत आहे.

राज्य महिला आयोगाने या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांना पत्र लिहून वकिलांचे वर्तन ॲडव्होकेट्स कायदा, 1961 च्या तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याचे म्हटले आहे. संवेदनशील प्रकरणांमध्ये वकिलांनी माध्यमांशी बोलताना काळजी घेणे आवश्यक आहे, असे आयोगाने नमूद केले. तसेच, अशा प्रकरणांमध्ये वकिलांसाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याची सूचना आयोगाने केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.

You might also like

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

महिला आयोगाच्या पत्रात काय म्हटले आहे?

पुण्यातील मयत विवाहिता वैष्णवी हगवणे हिचा सासरकडून हुंड्यासाठी होणारा छळ आणि मृत्यू या अतिशय संवेदनशील विषयाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. असे असताना आरोपीच्या अधिवक्त्यांकडून माध्यमांत मयत वैष्णवीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आरोप केले जात आहेत. आपणांस जे काही सादर करायचे बाहे ते आपण मा. न्यायालयात पुराव्यानिशी सादर करावे. आपल्या वक्तव्यामुळे पीडितेची प्रतिमा मलीन होते आहे, त्यामुळे तिच्या कुटुंबियांना मानसिक, भावनिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असे महिला आयोगाने दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

‘समाज म्हणून वैष्णवी हगवणे हिला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. न्याय मिळण्याच्या प्रक्रियेदरम्यान माध्यमातून होणारे असे चारिम्यहनन पूर्णपणे चुकीचे असून त्यांचे मनोबल खच्ची करणारे आहे. अधिवक्त्यांनी समाजातील एक जबाबदार घटक म्हणून अधिक सजग राहून पीडितेच्या प्रतिष्ठेची व गोपनीयतेची काळजी घेणे अपेक्षित आहे. भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी आपल्या माध्यमातून याचा गांभीर्याने विचार व्हावा आणि महाअधिवक्त्यांसाठी सुस्पष्ट व नीतीसंगत नियमावली ठरवावी’, अशी सूचना महिला आयोगाने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांना दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

-‘तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबरदारी आयोगाची’; रुपाली चाकणकरांचं जनसुनावणीत आश्वासन

-हगवणेंचा आणखी एक धक्कादायक प्रताप उघड: ‘त्या’ प्रकरणी पोलिसांना फसवलं, नेमका काय प्रकार?

-वैष्णवीच्या वडिलांची मागणी, सरकारने घेतला मोठा निर्णय; नेमकं काय घडलं?

-वैष्णवी हगवणे: गृहविभागाकडून मोठी कारवाई; थेट ‘त्या’ IPS अधिकाऱ्याचा पदभारच घेतला काढून

-वैष्णवी हगवणे प्रकरण: “हॅलो, निलेशला पकडलंय गाडीच्या डिक्कीत डांबलाय..” नेमकं प्रकरण काय?

Tags: puneVaishnavi HagawaneVipul Dushingपुणेविपुल दुशिंगवैष्णवी हगवणे
Previous Post

‘तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबरदारी आयोगाची’; रुपाली चाकणकरांचं जनसुनावणीत आश्वासन

Next Post

‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

News Desk

Related Posts

Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

by Team Local Pune
June 6, 2025
Pune Police
Pune

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

by News Desk
June 6, 2025
Maharashtra Police
Pune

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

by News Desk
June 6, 2025
Mulshi Patern
Pune

पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…

by News Desk
June 6, 2025
राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू
Pune

राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

by News Desk
June 6, 2025
Next Post
Ajit Pawar

'या' लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? 'लाडकी बहिण योजने'बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

Please login to join discussion

Recommended

Supriya Sule And Devendra Fadnavis

‘लाडकी बहीण योजनेचे २१०० नाही तर ३ हजार रुपये द्या’; सुप्रिया सुळेंची मागणी

December 6, 2024
Devendra Fadnavis

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणारच?, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘चूक ते चूकच’

April 5, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

June 6, 2025
Pune Police
Pune

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

June 6, 2025
Maharashtra Police
Pune

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

June 6, 2025
Mulshi Patern
Pune

पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…

June 6, 2025
राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू
Pune

राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

June 6, 2025
Shashikant Chavan
Pune

हगवणे प्रकरणात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचं कनेक्शन; 700-800 कोटींची मालमत्ता असणारा शशिकांत चव्हाण कोण?

June 6, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved