Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

GBS Disease: “त्याच पाण्यामुळे ‘जीबीएस’ होतोय”; आरोग्यमंत्र्यांनी दिली कबुली

by News Desk
January 28, 2025
in Pune, आरोग्य, पुणे शहर
GBS Prakash Abitkar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात गुइलिन बॅरी सिंड्रोम या आजाराची रुग्णसंख्या शंभरी पार केली असून आतापर्यंत शहरातील ८० टक्के रुग्ण हे सिंहगड रोडवरील नांदेड गाव भागातील आहेत. नांदेड गाव तसेच आजूबाजूच्या परिसरात नांदेड गावातील एका विहीरातून पाणी पुरवठा होतो. याच विहीरीतील दूषित पाण्यामुळे जीबीएस होत असल्याची शंका होती. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या विहीरीची पाहणी करत या पाण्याचे परिक्षण करण्याचे आदेश दिले होते. जीबीएसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी नांदेड गावातील विहीरीच्या पाण्यामुळेच जीबीएस होत असल्याची कबुली दिली आहे.

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी देखील नांदेड परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल असलेल्या जीबीएस रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यानंतर आरोग्यमंत्र्यांनी सर्व शासकीय यंत्रणांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

नेमकं काय म्हणाले आरोग्य मंत्री?

“गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नांदेड परिसरातील विहिरीतून पाणीपुरवठा होत असलेल्या भागात ८० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. विहिरीवर आच्छादन नसल्याने अथवा अन्य मार्गाने पाणी दूषित झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विहिरीतील दूषित पाण्यामुळे जीवाणू आणि विषाणूसंसर्ग होऊन त्यातून जीबीएसचे रुग्ण वाढल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आमची प्राथमिकता रुग्णसंख्या वाढू न देण्यास आहे. रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत.”

View this post on Instagram

A post shared by Prakash Abitkar (@prakash_abitkar)

दरम्यान, ‘राज्यातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्याची गरज आहे. या दृष्टीने आरोग्य विभागाकडून नियमावली तयार केली जाणार आहे. नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी सर्व यंत्रणांसाठी ही नियमावली आहे. यामुळे नागरिकांना भविष्यात दूषित पाणी मिळणार नाही आणि पर्यायाने त्यामुळे होणारे आजारही टाळता येतील’, असेही प्रकाश आबिटकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-Pune: पुण्यात वाढला GBSचा धोका; केंद्राचं पथक पुण्यात दाखल

-GBS: पुणे पालिकेच्या ढिसाळ कारभारावर मुख्यमंत्री नाराज; थेट माजी आयुक्तांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

-डेटिंग अ‌ॅपवर मैत्री, ‘गे’ व्यक्तींना अज्ञान स्थळी भेटायला बोलवायचे अन्…; पुण्यात धक्कादायक प्रकार समोर

-अजितदादांच्या विश्वासू नेत्याची मुजोरी; अद्याप अटक नाही, अजित पवार म्हणाले…

-पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब

Tags: GBSHealth MinisterNandedPrakash Abitkarpuneआरोग्य मंत्रीजीबीएसनांदेडपुणेप्रकाश आबिटकर
Previous Post

Pune: पुण्यात वाढला GBSचा धोका; केंद्राचं पथक पुण्यात दाखल

Next Post

लहु बालवडकरांचा आरोग्य उपक्रम प्रेरणादायी; ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’ने समाजाला नवी दिशा

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Balewadi

लहु बालवडकरांचा आरोग्य उपक्रम प्रेरणादायी; 'अटल सेवा महाआरोग्य शिबिरा'ने समाजाला नवी दिशा

Recommended

ओ ऽऽऽमोठ्ठया ताई… शिवतारेंचे बंड थंड होताच चित्रा वाघांनी सुळेंना डिवचलं

ओ ऽऽऽमोठ्ठया ताई… शिवतारेंचे बंड थंड होताच चित्रा वाघांनी सुळेंना डिवचलं

March 28, 2024
Harshwardhan Patil

‘ते इंदापूरमध्ये बोलले तो युतीधर्म आहे? मला अडाणी समजू नका’; हर्षवर्धन पाटलांनी व्यक्त केली मनातली खदखद

August 30, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved