पुणे : राज्यात नगरपरिषद-नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० डिसेंबरला पार पडणार आहे. तर २१ डिसेंबरला दोन्ही टप्प्यातील मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मजमोजणीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
आता राज्यातील महापालिका निवडणुकांचा क्रम सुरू होणार आहे. १५ डिसेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू होणार असून प्रथम ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील महापालिकांचे मतदान होईल. त्यानंतर ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील मोठ्या महापालिकांचा नंबर लागेल. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे आणि पुणे या तीन महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका एकत्र घेतल्या जाणार आहेत.
सुरुवातीला निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुका सर्वांत शेवटी घेण्याचे संकेत दिले होते. मात्र नगरपरिषद-नगरपंचायतीची मतमोजणी झाल्यानंतर लगेच महापालिकांचा क्रम ठेवण्यात आला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकाच वेळी प्रचंड उलथापालट होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधू यंदा एकत्र आल्याच्या चर्चांमुळे ही लढत आणखी रंगतदार होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगणार असून मुंबईसह पुणे आणि ठाणे येथील सत्ता कोणाकडे जाते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपचा भ्रष्टाचार उघड करणारी ‘फाइल’ उद्धव ठाकरेंकडे; पुण्यात ठाकरे सेनेची रणनीती
-नवी मुंबईत ‘स्त्रीशक्ती’चा हिरवाईला हात; २०० झाडांचा संकल्प, मधुरा गेठे यांच्या हस्ते शुभारंभ!
-नागरी मंच सक्षम करणार, पालिका आयुक्तांची घोषणा, नागरिक म्हणाले, ‘आधी आमचं ऐका’
-कमला नेहरू रुग्णालयाला नवजीवन; २५ तज्ज्ञ डॉक्टर, अडीच लाखांपर्यंत पगार, ४२ कोटींची दुरुस्ती!














